Shocking accideng video: रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना नेहमी सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो. कारण कधी, कसा अपघात होईल सांगू शकत नाही. दिवसेंदिवस या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. एकापेक्षा एक भीषण अपघातांच्या घटना समोर येत असतात. रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. दरम्यान, आणखी एक भीषण अपघात पुलावर झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. तुम्हीच पाहा या अपघातामध्ये नक्की चूक काय झाली?
या अपघातामध्ये नक्की चूक काय झाली?
कधी स्वत:च्या चुकीमुळे तर कधी समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे रस्ते अपघात होतात, हे तुम्ही पाहिले असेल. रस्त्यावरून गाडी चालवताना तुम्ही अनेकदा फलकदेखील वाचले असतील की, ‘मनाचा ब्रेक हा सर्वोत्तम ब्रेक.’ पण, असं असलं तरी या सगळ्याचं पालन न करता अनेक लोक आपल्या मनाप्रमाणे सुसाट गाडी पळवतात. पण लोक हे विसरतात की, रस्त्याचे नियम हे त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी बनवलेले असतात. सध्या समोर आलेला अपघात हा ओव्हर स्पिडिंगमुळे झाला आहे. हीच या अपघातातील चूक आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, जागीच गाडीचे तुकडे उडताना तुम्ही व्हिडीओतदेखील पाहू शकता.
भीषण अपघात
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने एका पुलावरून जात होती, मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या गाड्यांना धडकून शेवटी पुलाच्या बाजूला जाऊन जोरदार धडकते. यावेळी ही धडक इतकी जोरदार होती की अक्षरश: पुलाची बाजूही तुटली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: मुंबईत बेरोजगारी मोठी! भरती ३०० जागांसाठी अन् जमले हजारो तरुण; एअर इंडियाच्या गेटपुढे मोठा गोंधळ
घटनेनंतर घाटात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला केली. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.
तुम्ही सदैव सावध राहा
हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.