Shocking accideng video: गाडी चालवताना नेहमी सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो. कारण- कधी, कसा अपघात होईल ते सांगू शकत नाही. दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. एकापेक्षा एक भीषण अपघातांच्या घटना समोर येत असतात. रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचे झाले तर दरवर्षी इथे रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. दरम्यान, भीषण अपघाताचा आणखी एक लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. एका महिंद्रा स्कॉर्पिओ कारचे नियंत्रण सुटले आणि चार सेकंदांतच भयानक दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत असून, तुम्हीच सांगा नेमके कुठे चुकले?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात बुधवारी एका महिंद्रा स्कॉर्पिओ कारचे नियंत्रण सुटले आणि ही कार थेट एका दुकानात घुसली. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. तुम्हीच पाहा या अपघातामध्ये नक्की चूक काय झाली?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात दोन माणसे दिसत आहेत. एक जण खुर्चीवर बसलेला आहे; तर दुसरा काऊंटरवर उभा आहे. यावेळी अचानर एक स्कॉर्पिओ कार पुढे सरकत थेट टायरच्या दुकानात शिरताना दिसत आहे. डेस्कवर बसलेल्या माणसाने बिल बनविताना कार अगदी वेळेत पाहिली आणि त्याचा जीव वाचवला. तर, दुसऱ्या माणसाला कारची धडक बसली. त्याच्या जीवावर बेतले नसले तरी त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात केवळ चार सेकंदांत घडला असून, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. यामध्ये चूक पूर्णपणे कारचालकाची आहे. त्याने कारवर व्यवस्थित नियंत्रण न ठेवल्यानेच हा अपघात घडला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेतकरी मित्रांनो शेतात मोटार चालू करायला जाताय? थांबा, या शेतकऱ्याबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर Ghar Ke Kalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. असे अपघात टाळण्यासाठी तुम्ही सदैव सावध राहणे हा एकच उपाय आहे. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scorpio accident scorpio goes out of control enters tyre shop hitting man sitting at billing counter in ups mau shocking video goes viral on social media srk