scrap collector Bought iPhone: आयफोन १६ लाँच झाल्यापासून अनेक मोबाइलवेड्या चाहत्यांची आयफोन घेण्यासाठी धडपड दिसून आली. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील आयफोन स्टोअरमध्ये १६ ते १८ तास रांगेत उभं राहिल्यानंतर आयफोन विकत घेतलेल्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. विशेषतः तरूणांमध्ये आयफोनचं प्रचंड वेड आहे. पण आयफोनचं वेड हे तरूण, कटेंट क्रिएटर्स, प्रोफेशनल्स यांच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर भंगार गोळा करणाऱ्या एका व्यक्तीलाही आयफोनची भुरळ पडली आहे. या व्यक्तीने तब्बल दोन महागडे आयफोन विकत घेतले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक्सवर पराग आगाशे नामक अकाऊंटवरून सदर व्हिडीओ पोस्ट झाला. त्यानंतर आणखी काही जणांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमधील व्यक्ती स्वतःला भंगार गोळा करणारी आहे, असे सांगते. तसेच व्हिडीओ ज्यांनी काढला, त्यांनी या व्यक्तीला काही प्रश्न विचारले. त्याची अतिशय गमतीदार उत्तरं दिल्यामुळं हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान

हे वाचा >> नाद करा पण मुंबईकराचा कुठं…! पत्नी अन् मुलांसाठी पठ्ठ्यानं एकाच वेळी खरेदी केले चक्क ५ आयफोन; बघा Video

काय आहे व्हिडीओमध्ये?

कपड्यांवरून गलितगात्र असलेल्या एका व्यक्तीच्या हातात नवा कोरा आयफोन पाहिल्यानंतर काही जणांनी त्याचा व्हिडीओ काढत, सदर आयफोन कुठून आणला? असा प्रश्न विचारला. तू काय काम करतो, असा प्रश्न व्हिडीओ काढणाऱ्यांनी विचारला. त्यावर व्हिडीओतील व्यक्ती म्हणाला की, मी १२ महिने भंगार गोळा करतो. काच, बाटली, प्लास्टिक गोळा करतो.

तू मोबाइल कितीला घेतला? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “हा ८५ हजाराला घेतला. आणखी एक मुलाला घेतला आहे, तो एक लाख ८० हजारांचा आहे. पोराला म्हणालो होतो, तू दहावीला चांगले मार्क आण, तुला आयफोन घेऊन देतो. त्यानेही जिद्दीने अभ्यास केला आणि ८९ टक्के मार्क्स मिळविले” यानंतर व्हिडीओ काढणारे लोक या व्यक्तीला कुठे राहतो, असे विचारतात. त्यावर तो म्हणतो की, कर्वेत रहातो.

सदर व्यक्ती मराठी बोलत असला तरी तो नेमका कुठला आहे? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळता येऊ शकलेली नाही.

हे ही वाचा >> Old iPhone Exchange offer: जुना फोन द्या, नवीन iPhone 16 मिळवा; जाणून घ्या, ॲपलची ट्रेड इन ऑफर, डिस्काऊंट

डॉ. प्रशांत भामरे यांनीही हाच व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. “याने आयफोन घेतला, स्वतःला पण आणि पोराला पण ! कारण तो भंगार गोळा करण्याचा का असेना काम करतो!”, असे कॅप्शन लिहून त्याने या माणसाच्या कामाचे कौतुक करून त्याच्या मेहनतीला सलाम केला आहे.

डॉ. भामरे यांच्या पोस्टखाली अनेकांनी गमतीशीर कमेंट टाकल्या आहेत. एकाने म्हटले की, आता उद्या डिग्री कचऱ्यात टाकते. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, दिवस भर चौकात बसून गुटखा तंबाखू खाऊन बसण्यापेक्षा काम करून स्वतः ला पोराला फोन घेतले बरंच आहे ना!! तिसऱ्या एका युजरने म्हटले, ‘समाजाच्या दृष्टीने निकृष्ट असे कष्ट करून कमावून घेतला आहे. ना भीक मागून ना चोरी लबाडी करून.”