प्रत्येक पशू, पक्षी, प्राण्याचे स्वतःचे वेगळेपण आहे. माकड माणसाप्रमाणे वागतात आणि पोपट बोलण्यात पटाईत असतात. पण काही पक्षी चोरही असतात असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर? तुमचा विश्वास बसेल का? सध्या अशाच एका पक्ष्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याने चक्क एका सुपरमार्केटमधून चोरी केलीय. होय. हे खरंय.
रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर मास्क लावून घरफोडी करणारे आणि दुकान लुटणारे चोर तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. पण या व्हायरल व्हिडीओमधल्या एका खास चोरट्याने जी चोरी केलीय ती पाहून तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. या पक्ष्याच्या चोरी करण्याची पद्धत पाहून तुम्ही हैराण व्हाल. आपल्या चोचीत तब्बल २९ हजार रूपयांचे खाद्यपदार्थ धरून भुर्रर्र झालेला हा पक्षी दुसरा तिसरा कुणी नाही तर सीगल आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सीगल नावाचा पक्षी दबक्या पावलानं सुपरमार्केटमध्ये घुसतो आणि तिथून खाद्यपदार्थांची पाकिट घेऊन पळ काढतो. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खूपच मजेशीर आहे. हा सीगल इकडे-तिकडे बघत दुकानात घुसतो आणि चिप्सची पाकिटे घेऊन थेट कपाटात जातो. त्याच्या खालच्या शेल्फवर ठेवलेले पॅकेट उचलले की लगेच बाहेर येतो. रस्त्यावर दुसरा सीगल त्याची वाट पाहत असतो आणि दोघेही तिथून आनंदाने निघून जातात.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
सीगलची चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान पसंती दिली आहे. जो एक समुद्री पक्षी आहे. त्यांच्या शिकारीचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सीगल्सच्या अशा भन्नाट चोरीचा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल. हा व्हिडीओ तसा जुना आहे. पण हा व्हिडीओ नव्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.