माणसं आणि प्राण्यांमध्ये एक जिव्हाळ्याचं नात असल्याचं व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. पाळीव प्राण्यांसोबत खेळायला अनेकांना आवडतं. काही जण तर सापांसोबत मस्ती करून धोकादायक स्टंटबाजी करण्याचा प्रयत्नही करतात. पण पाण्यातील सील माशाच्या व्हायरल व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांनी मनं जिंकली आहेत. एरव्ही समुद्रात पोहणारा डॉल्फिन मासा माणसांशी एका वेगळ्याच शैलीत संवाद साधताना दिसतो. मात्र, समुद्रातील सील मासाही आता माणसांसोबत प्रेमाचे धागे बांधताना दिसत आहे. समुद्रात पोहोयाला गेलेल्या एका तरुणाजवळ अचानक एक सील मासा आला आणि त्या माशाने त्या मुलाला थेट गळाभेटच दिली. सील माशाचं असं प्रेम पाहून त्या तरुणाच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू तरळले.
गॅब्रियल कॉर्नो नावाच्या युजरने या सील माशाचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. एक मुलगा समुद्राच्या पाण्यात पोहत असताना एक मोठा सील मासा त्याच्याजवळ येतो आणि त्याला गलाभेट देतो. सील मासा त्याच्या पंखाने तरुणाला घट्ट पकडून मिठी मारत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. माशाचं हे प्रेम पाहून तो मुलालाह मनसोक्त आनंद झाला. पाळीव प्राण्यांप्रमाणेच समुद्रातील काही मासे माणसांशी जीवलग मैत्री करतात, असं व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्की म्हणता येईल.
इथे पाहा व्हिडीओ
ट्वीटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला २.५ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हजारो नेटकऱ्यांनी सील माशाच्या या व्हिडीओला लाईकही केलं आहे. तर काहींनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “सील माशाचं प्रेम पाहून माझेही डोळे पाणावले.” सील मासा खूप प्रेमळ आणि मनमिळावू असतो. त्याला माणसांसोबत संवाद साधणं नेहमीच आवडतं, असंही अन्य एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं. डॉल्फिन, सीलसारखे मासे समुद्रात पोहणाऱ्या माणसांना संकटकाळातही मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बोलता येत नसलं, तरी ते माणसांचे हावभाव ओळखतात आणि त्यांच्याशी मैत्रीची नाळ जोडण्याचा प्रयत्न करतात.