Kerala Second Mpox Case : मंकी पॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तर आता भारतातही संशयित मंकी पॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. केरळमध्ये मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण सापडला असून हा रुग्ण एर्नाकुलम येथील निवासी आहे. केरळ राज्य आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाची आरोग्य स्थिती सध्या स्थिर आहे आणि रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आफ्रिकन देशांत एम पॉक्स म्हणजेच मंकी पॉक्सची साथ वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे. आफ्रिकेतील १२ हून अधिक देशांत पसरत असलेल्या या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, अशातच केरळमध्ये मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण आढळल्यामुळे सध्या कोल्डप्ले हा विषय ट्रेंडिंगवर आहे.

केरळमध्ये मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला आहे. भारतातील मंकी पॉक्सची ही दुसरी घटना आहे. हा २९ वर्षीय तरुण यूएईमधून केरळमधील एर्नाकुलम येथे परतला होता. त्याला खूप ताप होता. या व्यक्तीला एर्नाकुलम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
The woman watered to the monkey
‘आई तू खरंच देवासारखी आहेस…’ तहानलेल्या माकडाला मिळाली आईची माया… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “आई ती आईच”
woman fed a thirsty monkey water
आधी बॅगेवर, मग बाकावर! पाण्याच्या थेंबासाठी सैरभैर झालेल्या माकडाला ‘तिने’ ओळखले; VIDEO पाहून म्हणाल माणुसकी आहे जिवंत
Bihar Class 10 Girl Accident
घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का, खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू
Mirakwada port will be more advanced than Malpi port
मलपीपेक्षाही मिरकवाडा अत्याधुनिक बंदर होणार
Jungle Viral Video
‘भूक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही…’ दोन प्राण्यांमध्ये एका घासावरून भांडण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘नात्यात स्वार्थ जिंकतो’
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा सुरेश धस यांच्याकडून उल्लेख; म्हणाले, “आरोपी आकाच्या मुलाभोवती…”

या माणसाला नंतर क्लेड 1B संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- देशात क्लेड 1B संसर्ग संक्रमणाचे हे पहिलेच प्रकरण आहे; ज्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Mpox ला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले. यापूर्वी राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी परदेशातून केरळला परतणाऱ्या सर्वांनी एम पॉक्सची लक्षणे आढळल्यास उपचार घ्यावेत, असे आवाहन केले होते. रुग्ण वाढल्यास त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने केरळमधील १४ रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहेत.

भारतातील पहिला MPox रुग्ण हरियाणात आढळला

९ सप्टेंबर रोजी देशात मंकी पॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली. हरियाणातील हिसार येथे २६ वर्षीय तरुणामध्ये जुना स्ट्रेन क्लेड-२ विषाणू आढळून आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, ती व्यक्ती परदेशातून परतली होती. ८ सप्टेंबर रोजी त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचे आरोग्य नमुने घेऊन तपासण्यात आले, त्यामध्ये मंकी पॉक्सची पुष्टी झाली.

मंकी पॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा विषाणूंद्वारे पसरणारा आजार आहे. साधारणपणे, या विषाणूच्या संसर्गाचे अनेक दुष्परिणाम होत नाहीत, परंतु काही प्रकरणांमध्ये ते प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे फ्लूसारखी लक्षणे दिसतात आणि शरीरावर पू भरलेल्या जखमा होतात. हा विषाणू ऑर्थोपॉक्स विषाणू वंशाचा सदस्य आहे, जो चेचकांसाठी देखील जबाबदार आहे.

(सौजन्य – google trend)

हेही वाचा >> mpox : मंकीपॉक्स आजाराची लक्षणं काय? कोणत्या कारणांमुळे पसरतो ‘हा’ आजार? गूगल ट्रेंड्समध्ये ‘या’ शहरांत झालाय सर्वाधिक सर्च

गुगल ट्रेंड्समध्ये मंकी पॉक्स

भारतात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळल्यापासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, त्यामुळे सध्या मंकीपॉक्स हा विषय ट्रेंडिंगवर आहे.. वर दिलेल्या गुगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, गेल्या १८ तासांत पाचशेहूंन अधिक लोकांनी यासंदर्भात सर्च केलेलं आहे. तर केरळ सेकंड एमपॉक्स केस हा विषय ५ व्या क्रमांकावर ट्रेंडींगवर आहे.

Story img Loader