Kerala Second Mpox Case : मंकी पॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तर आता भारतातही संशयित मंकी पॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. केरळमध्ये मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण सापडला असून हा रुग्ण एर्नाकुलम येथील निवासी आहे. केरळ राज्य आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाची आरोग्य स्थिती सध्या स्थिर आहे आणि रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आफ्रिकन देशांत एम पॉक्स म्हणजेच मंकी पॉक्सची साथ वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे. आफ्रिकेतील १२ हून अधिक देशांत पसरत असलेल्या या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, अशातच केरळमध्ये मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण आढळल्यामुळे सध्या कोल्डप्ले हा विषय ट्रेंडिंगवर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा