Viral Video: आपल्यातील अनेक जण पाळीव प्राण्यांवर जीव ओवाळून टाकतात. काही जण तर त्यांना मार्केटमध्ये मिळणारे त्यांचे जेवण, खाद्यपदार्थ खाऊ घालतात. त्यांना सकाळी फिरायला, तसेच प्रवासातही सोबत घेऊन जातात. पण, काही जण याउलट असतात. पाळीव असो किंवा भटके प्राणी, त्यांना बघता क्षणी हडतुड करतात, त्यांना मारतात किंवा त्यांच्यावर दगडफेक करून उगीच त्यांना त्रास देताना दिसतात. आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक महिला श्वानाच्या पिल्लाला कचराकुंडीत फेकताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील आहे. महिलेच्या हातात एक श्वानाचे पिल्लू असते; तर दुसरे पिल्लू तिच्या मागून चालत येत असते. पुढे या व्हिडीओत ती महिला हातातल्या श्वानाच्या पिल्लाला कचराकुंडीत फेकताना दिसते. त्यानंतर तिच्यामागून चालत येणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लालासुद्धा ती उचलून कचराकुंडीत फेकते आणि व्हिडीओचा तिथेच शेवट होतो. नक्की काय घडले ते एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.

Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
Squid Game
Video: “पुण्यात खेळला जाणार का Squid Game?”, पुणे स्टेशनवर Ddakji खेळताना दिसल्या दोन व्यक्ती? वाचा, पुणेकरांच्या मजेशीर प्रतिक्रिया
The tiger reached the dog through the crowd of tourists
‘मरण थांबवणं कोणाच्या हातात आहे…’ पर्यटकांच्या गर्दीतून वाघाने श्वानाला गाठलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Bhandara, tigress , Three people arrested
भंडारा : वाघिणीचे तुकडे करून फेकणे पडले महागात; तिघांना अटक
Dog beaten Thane, Dog eye failure, Dog thane,
ठाण्यात मारहाणीमुळे श्वानाचा डोळा निकामी, चौघांवर गुन्हा दाखल
King Cobra Shocking Video viral
बापरे! भल्यामोठ्या किंग कोब्राची तरुण घेत होता किस, तितक्यात घडले असे काही की…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

हेही वाचा…पोत्यातून तांदूळ काढण्यासाठी जुगाड; पठ्ठयाने प्लास्टिकच्या बाटलीचा केला असा उपयोग की… VIDEO पाहून खरंच थक्क व्हाल

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

https://fb.watch/svKLJSbyNP/

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा सर्व प्रकार घडताना एक अज्ञात पुरुष तिथे उभा असतो. पण, तो या घटनेकडून बघूनसुद्धा दुर्लक्ष करतो आणि स्वतःचे काम करण्यात मग्न आहे, असे दाखवतो. त्या महिलेच्या चेहऱ्यावरसुद्धा काही चुकीचे केले असण्याचे भाव दिसण्याऐवजी ती खूप बिनधास्त दिसत आहे. तसेच श्वानाच्या पिल्लांना कचराकुंडीत फेकून देण्याची योजना तिने आधीपासूनच आखली होती, असे तिच्या कृत्यातून स्पष्ट होत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ फेसबुकच्या @St Landry Crime Stoppers या अकाउंटवरून ३ जूनरोजी शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंर स्थानिक पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीलाही संबंधित घटनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतले, असे सांगण्यात येत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करताना दिसून आले आहेत.

Story img Loader