सतत धावपळीत व्यग्र असलेल्या मुंबईकरांचं एका खास गोष्टीनं लक्ष वेधून घेतलं आहे. ही खास गोष्ट म्हणजे नेमकी काय? तर ७० वर्षांचे गुप्ताजी हे बोरिवली येथील क्वीन्स लॉन या सोसायटीचे सुरक्षा रक्षक आहेत. ते दररोज कामावर येताना आपल्या पाळीव कुत्र्यासोबत म्हणजेच टायगरसोबत सायकलवरून २० किलोमीटरचा प्रवास करतात. त्यांच्या या गोष्टीमुळे गुप्ताजी तिथल्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि लोकांना त्यांचं फार कौतुकही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुप्ताजी सगळ्यात पहिले आपल्या सायकलच्या बारवर लावलेल्या पिशवीत टायगर व्यवस्थित बसला आहे ना याची खात्री करतात. नंतर ते दोघेही आपल्या सायकलवरून क्वीन्स लॉन्सच्या दिशेने प्रवास सुरू करतात. मुंबईच्या गर्दीतून गुप्ताजी आणि टायगर प्रवास करताना अनेकांचं लक्ष वेधून घेतात. पण, गुप्ताजींचं प्रेम हे फक्त टायगरपुरतंच मर्यादित नाही, तर इतर लहान लहान पिल्लांवरही त्यांचं लक्ष असतं. सगळ्या पिल्लांना अन्न आणि राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळतेय की नाही याचीसुद्धा ते खात्री करतात.

हेही वाचा : गुलाबी रंगाची मिनी बुलेट रस्त्यावर फिरवतोय तरूण; जुगाड करून पालटले बंद पडलेल्या स्कूटरचे रूप; पाहा Viral Video

@aww_buds इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्याला १६३k इतके लाइक्स मिळाले आहेत. एक वृद्ध व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासोबत दररोज २० किलोमीटरचा प्रवास सायकलने करते हे बघून सगळ्यांनाच त्यांचं कौतुक वाटत आहे