आर्मीच्या एका जवानाने भर रस्त्यात एका स्कूटर चालकाला लाठीने मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्कूटर चालक हा विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्याने जवानाने त्याला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरस होतो आहे. एका कारच्या डॅशकॅममध्ये ही घटना कैद झाली आहे. दरम्यान, यावेळी ड्युटीवर असलेल्या ट्राफीक पोलीस कर्चमाऱ्याने मध्यस्थी करत प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल व्हिडीओनुसार, एक कार रस्त्याने जात असताना एक स्कूटर चालक अचानक विरुद्ध दिशेने येताना दिसला. त्यामुळे कार चालकाने गाडी थांबवली. त्यावेळी स्कूटर चालकाने त्याला बाजुने जायला सांगितले. मात्र, स्कूटर चालक विरुद्ध दिशेने येत असल्याने कार चालकाने पुढे जाण्यास नकार दिला. बराच वेळ कार रस्त्याच्या मधात उभी असल्याने ट्राफीक जाम झालं.

हेही वाचा – लोखंडी पत्रा उडाला अन्…; हेल्मेटमुळे वाचला जीव; मुंबईतील भीषण अपघाताचा Video पाहून चुकेल काळजाचा ठोका!

अशातच रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने येत असलेल्या आर्मीच्या ट्रकमधून एक जवान खाली उतरला. त्याने मागून स्कूटर चालकाच्या हेल्मेटवर हाताने मारायला सुरुवात केली. मात्र, तरीही स्टूटर चालकरस्त्यावरून बाजुला व्हायला तयार नसल्याने त्या जवानाने गाडीतून लाठी आणत स्कूटर चालकाला मारण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – जय जवान पथकाचा १० थरांचा थरारक प्रयत्न; एक चूक अन् मनोरा कोसळला, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकं काय चुकलं?

अखेर या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या ट्राफीक पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थी करत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे.