Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ हे थक्क करणारे असतात. बऱ्याचदा काही लोकांना प्रचंड मेहनत करूनही एखाद्या कामात यश मिळत नाही. दुसरीकडे, त्यापेक्षा कमी मेहनतीत काही लोक यशस्वी होतात. अशावेळी त्या व्यक्तीचं नशीब चांगलं आहे असं आपण सहज बोलून जातो. मात्र असं खरंच असतं का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे हा व्हिडीओ पाहून मेहनतीसोबत नशीब पण किती महत्त्वाचं आहे हे कळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, याठिकाणी धावण्याची स्पर्धा सुरु आहे आणि स्पर्धक जिंकण्यासाठी जिवाच्या आकांताने धावत आहेत. यावेळी स्पर्धा जिंकण्यासाठी अवघं दोन पावलांचं अंतर राहिलेलं असताना एक चिमुकला चुकून पुढे जातो आणि तेवढ्यात मागून येणारा स्पर्धक स्पर्धा जिंकतो. पहिल्या आलेल्या स्पर्धाकाचा गोंधळ झाल्यानं तो चुकून पुढे जातो आणि स्पर्धा हरतो. सगळ्यांच्या पुढे आणि पहिला आलेला स्पर्धक थोडंसं दुर्लक्ष झाल्यानं रिबीनच्या अवघ्या काही अंतरावर असताना चुकून पुढे जातो आणि हरतो. यावेळी एका चुकीमुळे त्याची सगळी मेहनत वाया जाते आणि तो हरतो.

“हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्यासारखं या चिमुकल्यासोबत घडलं आहे. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल. आयुष्यात एका सेकंदाची किंमत काय विचारणाऱ्यांना हा व्हिडीओ बघून कळेल की आयुष्यात एका सेकंदाची किंमत किती आहे.. हा चिमुकला जर पुढे गेलाच नसता तर कदाचित तो स्पर्धा जिंकला असता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “किती जगला यापेक्षा कसा जगला हे म्हत्त्वाचे” गरबा खेळताना आजोबा जोमात तरुणाई कोमात; VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर maharashtra_remix_reel नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओला “आज समजलं मेहनतीसोबत नशीब पण महत्त्वाचे असतं” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: See how littele boy losing race if you dont believe in luck and karma then just watch this video srk