पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या बेजबाबदार कारभाराची पोलखोल केली आहे. अगदी तास भर पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणीच पाणी साचते आहे. मुंबईच नव्हे तर पुण्याचीही अशीच अवस्था झाली आहे त्यामुळे आपण पुण्यात राहतो की पाण्यात राहतो असा प्रश्नही अनेक पुणेकरांना पडला आहे. दरम्यान पुण्यात पावसानंतर शहराची काय अवस्था होते याचे एकापाठोपाठ एकअनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान सध्या स्वारगेट बसतळ्याचा…माफ करा हा, स्वारगेट बसस्थानकाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की हे बसस्थानक की बसतळे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘जगातील अंतिम सत्य हेच आहे!’ तुमचं भलं व्हावं हे फक्त…; ट्रकमागील पाटी होतेय Viral

स्वारगेट बसस्थानक हे मध्यवर्ती पुण्याच्या भागात जेथून पुण्यात कुठेही जाणे सहज शक्य होते. कारण येथे शहरात कुठेही जाण्यासाठी पी.एम.पी.एम.एल. बस स्टँड तर आहेत पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी एसटी महामंडळाचं मोठं बसस्थानक आहे. येत्या काही वर्षात या परिसरात मेट्रो स्टेशनही सुरू होणार आहे. रोज लाखो प्रवासी स्वारगेट बसस्थानकावर येतात पण पावसाळ्यात या बसस्थानकाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसाचे पाणी बस स्थानकामध्ये साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. साचलेल्या पाण्यातूनच लोकांना जावे लागत आहे. हीच परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ ek_number_punekar नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बसस्थानक नाही, बस तळे, स्थळ :- स्वारगेट पुणे”

हेही वाचा – चीनच्या आकाशात दिसले चक्क सात सूर्य? विचित्र घटनेचा Video Viral, नक्की काय आहे रहस्य?

पुणेरी शैलीत अनेकांनी व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “पुण्याचा ओरिजनल स्विमिंग टँक.” दुसरा म्हणाला की, “कसा आहे आमच्या पुण्याचा समुद्र दीड दिवसाचा समुद्र”

व्हायरल व्हिडिओ पाहून प्रशासनाचे डोळे उघडतील का हे पाहावे लागेल. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी काय उपाययोजना केली जाते हे याकडे सर्वांचे लक्ष असेल.

राज्यात अडीच महिन्यात २१ टक्के अधिक पाऊस

राज्यात यंदा मान्सूनने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा दिला आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच राज्यात सरासरी पाऊस आहे. गेल्या अडीच महिन्यात राज्यात २१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात येत्या शनिवारपासून पाऊस पुन्हा एकदा पूर्णपणे सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. पाऊस पूर्णपणे सक्रीय होण्यासाठी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये रोज पाऊस पडत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: See what happens due to the rain on swargate bus station video is going viral snk