सोशलमीडियावार दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील प्राण्यांचेही अनेक व्हिडीओ असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांच्या काही गोष्टींवर अचंबित करणारे तर काही त्यांच्या प्रतिक्रियांवर पोट धरून हसायला लावणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गाणे म्हणत असताना कुत्र्याने दिलेली प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: हे प्राणी आहेत की माणसं? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Viral Video

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला माईकवर गाणे म्हणत असताना, तिथे बाजुला बसलेल्या कुत्र्याने चक्क कानावर हात ठेवल्याचे दिसत आहे. कदाचित महिलेचा आवाज बेसूर असल्याने कुत्र्याला तो आवाज नकोसा झाला असेल, असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.