कोणतीही बिकट परिस्थिती, कितीही मोठी अडचण असली तरीही त्या परिस्थितीला तोंड देण्याची ताकत आपल्या देशाच्या जवानांमध्ये आहे. आपल्या सैन्यातील सर्व जवानांचे देशाप्रती असलेले समर्पण वाखाणण्याजोगे आहे. काही दिवसांपूर्वीच हिमवादळासारख्या परिस्थितीत गुडघ्यापर्यंत बर्फात उभा असलेला लष्करी जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ बघून सर्वच भारतीय नागरिकांचा आपल्या जवानांप्रती असलेला अभिमान दुप्पट झाला असेल. असाच काहीसा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही केवळ आश्चर्यचकित होणार नाही, तर तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमानही वाटेल.
सैन्याचे जवान बर्फाच्या वादळात खेळत होते व्हॉलीबॉल
हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याचे जवान कडाक्याच्या थंडीमध्ये, बर्फाच्या वादळात व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओचं सर्वत्र कौतुक करण्यात येतंय. या व्हिडीओची विशेषतः अशी की या व्हिडीओमध्ये दिसणारे जवान हे कडाक्याच्या थंडीचा मुकाबलाच करत नाही आहेत तर तिचा आनंद देखील लुटत आहेत. अशा कडाक्याच्या थंडीत भल्याभल्यांची हालत खराब होते, परंतु भारतीय सैन्याच्या जवानांचे कौतुक जितके करावे तितके कमी आहे.
पोलिसाचा चोराला ‘सिंघम स्टाईल’ दणका; सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
कडाक्याच्या थंडीतही जवानांनी एकत्र येऊन असा लुटला आनंद
या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन संघात विभागले गेलेले जवान व्हॉलीबॉल खेळताना दिसून येत आहेत. गुण मिळवताच या सैनिकांनी एकमेकांना टाळ्या देऊन आनंद देखील साजरा केला. दुसरीकडे आपण पाहू शकतो की हे जवान या भयंकर थंडीमध्ये आपले हात एकमेकांना घासत तिथेच उभे आहेत. या व्हिडीओला शेअर करणारे आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी, “सर्वोत्तम हिवाळी खेळ. आमचे जवान.” असे आपल्या पोस्ट मध्ये लिहले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून १ लाख ३० हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.