सोशल मीडियावर दररोज हजारो लाखो व्हिडीओ शेअर होत असतात. यातील काही व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत, तर काही व्हिडीओ इतके मजेशीर आहेत की हसून हसून पोट दुखेल. म्हणजेच सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचं उत्तम माध्यम बनलं आहे. आज तुमचा मूड ऑफ असेल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी सर्दी झाल्याचा बहाणा करत ब्लँकेट घालून बेडवर पडली आहे. अचानक तिच्या आईला मुलीवर काहीसा संशय येतो आणि ती मुलीकडे जाते. मुलगी तिच्या डोक्यावरून ब्लॅंकेट घेऊन झोपलेली असते. आई तिच्या ब्लँकेटमध्ये डोकावून बघते. ब्लँकेटच्या आत मुलीचे कारनामे पाहून आई स्तब्ध होते. आईने आपल्याला रंगेहाथ पडकल्याचं पाहून मुलगी सुद्धा घाबरून जाते.
आणखी वाचा : “पप्पा आमच्यासाठी काम करतात, ते जेवणही करत नाहीत,” या चिमुकलीचा भावूक VIDEO VIRAL
खरंतर तिची मुलगी झोपण्याऐवजी ब्लँकेटमध्ये कोणाशी तरी चॅट करत होती. इतकंच नव्हे तर ती चॅट बॉक्समध्ये कुणाला तरी ‘I LOVE YOU TOO’ असं लिहिते. जोपर्यंत मुलगी मोबाईल लपवून ठेवत असते, तोपर्यंत तिची आई सगळे चॅट वाचून घेते.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा म्हशीला राग येतो…, असा केला हल्ला की सारेच जण गेटमधून बाहेर पडले
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : बकरी आणि गाढवाच्या मैत्रीचा VIDEO VIRAL, झाडाची पानं खाण्यासाठी केला असा जुगाड…
खरं तर, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की हा एक प्रँक व्हिडीओ आहे. परंतु सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप मोठ्या प्रमाणात पसंती दिली जातेय. हा व्हिडीओ यूट्यूबवर imkavy नावाच्या चॅनलवर अपलोड करण्यात आला असून तो आतापर्यंत १४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ‘तुम्ही कधी असे पकडले गेले आहेत का’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, “जर तुम्ही खरोखरंच असं पकडलं गेलात तर…”