समोर सिंहीणीला पाहून मोठमोठ्या प्राण्यांची अवस्था बिकट होते. सिंहीणी जंगलात निर्भयपणे फिरते आणि तिला पाहून आजूबाजूचे सर्व प्राणी एकतर पळून जातात किंवा कुठेतरी लपतात. मात्र, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो त्याहून पूर्णपणे वेगळे चित्र पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये एका म्हशीने सिंहीणीची अवस्था बिघडवली आहे.
सिंहीणीला पाहून म्हैस जाते तिच्या अंगावर धावून
सिंहीणीचा पराभव होऊ शकत नाही हे सर्व समज म्हशीने मोडून काढले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, समोर सिंहीणीला पाहून म्हशीचा राग अनावर होतो आणि ती तिच्या दिशेने धावून जाते. म्हैस सिंहीणीवर अशा प्रकारे धावून जाते की क्षणात आपल्या शिंगांनी उडवूंन तिला पालथं घालते. व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहे. कारण सिंहीणीला पाहून म्हैस पळून जात नाही.
आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’
आणखी वाचा : ऐश्वर्या अभिषेक आणि दीपिकासोबत डान्स करताना झाली बेधुंद…, पाहा Video
म्हशीने सिंहीणीला अनेक वेळा लोळवले आणि जमिनीवर आपटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे सिंहीणीची प्रकृती बिघडते. हे दृश्य पाहून प्रत्येकजण थक्क होईल. ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून लोक त्या म्हशीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.