सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कधी प्राण्यांचा तर कधी एखादा व्यक्तीने केलेल्या भन्नाट जुगाडाचा व्हिडीओचा समावेश असतो. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक शिक्षकांचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता शिक्षकांनाही रील्स बनवण्याचा मोह आवरता येत नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत. नुकतंच काही दिवसांपुर्वी एका शाळेतील महिला शिक्षिकेने ‘पतली कमरिया मोरी आय… हाय… हाय…तिरछी नजरिया बोले हाय… हाय…’ या गाण्यावर केलेला डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एका शाळेतील महिला शिक्षिकेने शाळेतील कार्यक्रमादरम्यान स्टेजसमोर केलेला डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये शाळेतील कार्यक्रमादरम्यान स्टेजवर मुलांना डान्स करताना पाहून शिक्षिकेला डान्स करण्याचा मोह आवरता आला नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुले स्टेजवर नाचत असतानाच या मॅडम चक्क स्टेजच्या खाली असलेले मोकळ्या जागेत डान्स करायला सुरुवात करतात. शिवाय या मॅडमना नाचताना पाहून आणखी एक त्यांच्या एक सहकारी येतात आणि त्याही डान्स करायला सुरुवात करतात.

Teacher surprise class XII students
१२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेने दिला खास निरोप; डोळ्यांत पाणी आणेल इतका सुंदर क्षण; VIDEO चा चुकूनही चुकवू नका शेवट
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
Zilla Parishad's school teacher and students dance
‘आम्ही गड्या डोंगरचं राहणारं’, गाण्यावर शिक्षकाचा विद्यार्थ्यांसह रांगडा डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या शाळेची तादक’
video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
teacher Dance with students
भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनींसह ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांना आली शाळेची आठवण
Husband's Romantic Dance for Wife Wins Hearts
Video : भर रस्त्यावर तरुणाने बायकोसाठी केला जबरदस्त डान्स! हृतिक रोशनलाही टाकले मागे, व्हिडीओ एकदा पाहाच

हेही पाहा- तरुणीच्या जबरदस्त डान्सची नेटकऱ्यांना पडली भुरळ; Video पाहून म्हणाले, “नजर हटेना…”

दरम्यान, मॅडमना डान्स करताना पाहून खाली बसलेल्या मुलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मुलांनी मॅडमसाठी टाळ्या वाजवल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय ‘मॅडमला कंट्रोल करा’ असं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे. तर व्हिडीओत शिक्षिका आणि मुलं पंजाबी गाण्याच्या तालावर डान्स करत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल.

हेही पाहा- शाळेतून परतणाऱ्या वृद्ध शिक्षकाला महिला पोलिसांकडून काठ्यांनी मारहाण, संतापजनक घटनेचा Video व्हायरल

हा व्हिडीओ yourfunzone नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून महिला शिक्षिकेचा मुलांसोबतचा हा उत्कृष्ट डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेक नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला असून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यांनी मॅडमनी अप्रतिम डान्स केल्याचं म्हटलं आहे तर आणखी एकाने मॅडम कंट्रोलच्या बाहेर गेल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader