सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातलं तिचं घर-दार विकून प्रेमापोटी भारतात आली. तिने तिचा पती गुलाम हैदर हा तिला मारहाण करत होता यासह अनेक दावे केले आहेत. पाकिस्तानमध्ये महिलांची अवस्था काय आहे हे देखील तिने सांगितलं. एवढंच नाही तर भारतातल्या सचिन मीनाशी तिने लग्न केल्याचे फोटोही दाखवले. या सगळ्याचं केंद्र ठरला तो भारताचा शेजारी देश असलेला नेपाळ हा देश. नेपाळमधूनच सीमा भारतात आली. सीमाने हा दावा केला आहे की पशुपतीनाथ मंदिरात तिने सचिन मीनाशी लग्न केलं.

अशात एटीएसने तिची कसून चौकशी केली. या चौकशीत विचारलेले प्रश्न काय होते आणि त्याची सीमाने काय उत्तरं दिली हे समोर आलं आहे. आज तक या वृत्तवाहिनीने सीमा हैदरला प्रश्न विचारले आहेत. त्याची तिने काय उत्तरं दिली जाणून घेऊ.

Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Susheela Sujeet New Marathi Movie
दरवाजाच्या आड काय आहे गुपित? ‘सुशीला- सुजीत’ सिनेमाचं पोस्टर चर्चेत, पहिल्यांदाच एकत्र झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय

हे पण वाचा- VIDEO: “उद्या सगळेच पाकिस्तानातून सुना आणतील” सीमा हैदरला परत पाठवा, शेजाऱ्यांनी संशय व्यक्त करत केली मागणी

१) : एटीएसने तुम्हाला काय विचारलं त्यांना नेमका काय संशय होता?

सीमा हैदर: त्यांना माझ्यावरच संशय होता. मी त्यांना जे काही सांगितलं त्यावर त्यांना विश्वास नव्हता. माझं गाव कराची आहे कराची पासून इथवर मी कशी आले.. ते सगळं मी त्यांना सांगितलं.

२) खोली कम्रांक २०४ हॉटेल विनायक या नेपाळमधल्या हॉटेलमध्ये तुम्ही राहिला होतात त्यावेळी तुम्ही काय नाव लिहिलं?

सीमा हैदर : याबाबतीत हॉटेलचे लोक खोटं बोलत आहेत. त्यांनी आमच्याकडून कुठलही नाव लिहून घेतलं नाही आणि कसली चौकशीही केली नाही. नेपाळच्या चलनातले ५०० रुपये ते आमच्याकडून रोज घेत होते.

३) नेपाळच्या हॉटेलमध्ये तुम्ही तुमचं नाव प्रीती असं लिहिलं होतं का?

सीमा हैदर : नाही. मी कधीही प्रीती हे नाव लिहिलं नव्हतं. सीमा हैदर हे माझं नाव आहे हेच मी त्यांना सांगितलं. आत्ता जे हॉटेलचे लोक दावा करत आहेत तो त्यांच्या बचावासाठी आहे.

४)हॉटेल विनायकच्या मॅनेजरने सांगितलं की तुम्ही पब आणि बारमध्ये जाऊ इच्छित होतात हे खरं आहे का?

सीमा हैदर : कधीच नाही.. मी कधीही असं काही बोलणं केलेलं नाही. घरात मुलं असताना मी हे कसं करु शकले असते? आमच्याकडे फक्त सात दिवस होते आणि आम्ही ते दिवस आनंदात घालवले. सचिन यांनाही खूप आनंद झाला होता. त्यावेळी मला असं वाटलं नव्हतं की मी भारतात येईन.

हे पण वाचा- दोन व्हिडीओ कॅसेट, पासपोर्ट, चार मोबाइल आणि… सीमा हैदरकडून ATS ने काय काय जप्त केलं?

५) पशुपतीनाथ मंदिरात फक्त हिंदू पद्धतीने विवाह होतो, मग तुमचं लग्न कसं काय झालं?

सीमा हैदर : मी हिंदू आहे आणि मागच्या वर्षभरापासून मी हिंदू आहे. मी पाकिस्तानात होते तेव्हाही मनाने हिंदूच होते. मात्र तिथे मला माझं मत मांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. मी हिंदू आहे हे जर तिथे सांगितलं असतं तर माझी हत्या झाली असती.

६) तुमचा भाऊ पाकिस्तान लष्करात काम करतो का?

सीमा हैदर : मी याआधीही सांगितलं आहे की मी आणि सचिन जेव्हा भेटलो तेव्हाही माझा भाऊ मजुरीच करत होता. तो १२ वीपर्यंत शिकला आहे. त्याला काहीही काम मिळत नव्हतं. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझा भाऊ शिपाई म्हणून सैन्यात काम करु लागला. पण ज्या संशयाने त्याच्याकडे पाहिलं जातं आहे तशी परिस्थिती मुळीच नाही. माझा आणि त्याचा संबंध नाही कारण मी लग्न करुन वेगळी राहात होती.

७) तुम्ही भारतीय लष्कराशी संबंधित लोकांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती का?

सीमा हैदर : मुळीच नाही. माझ्याकडे फोन नाही. मी फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडिया वापरत नाही. माझ्या आयडीवर ५ दोस्त होते. सचिन आणि सचिनचे खास मित्र आता माझ्या आयडीवर लाखो फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. मात्र मी कुणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली नाही. असं म्हणत सीमाने सात प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तसंच मी कुणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नसल्याचंही म्हटलं आहे.

Story img Loader