India vs Pakistan Cricket Match Seema Haider : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा भव्य सामना आज खेळला जाणार आहे, त्यामुळे देशभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. अनेक जण भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसतायत. हा सामना दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. या सामन्यापूर्वी पाकिस्तानातून पळून भारतात पोहोचलेल्या सीमा हैदरने भारतीय संघाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सीमा म्हणाली की, ती भारतीय संघाच्या विजयासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.
सीमा हैदर म्हणाली की, भारताने हा सामना जिंकावा आणि देशभर आनंदाची लाट पसरावी अशी आमची इच्छा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वीही तिने भारतीय संघाला ‘बेस्ट ऑफ लक’ म्हटले आहे. सीमाने विश्वास व्यक्त केला की, टीम इंडिया नेहमीप्रमाणे दमदार कामगिरी करेल. सीमा हैदरप्रमाणेच देशातील कोट्यवधी क्रिकेट चाहते भारताच्या विजयासाठी शुभेच्छा देत आहेत.
सीमा हैदर काय म्हणाली?
सीमा हैदर म्हणाली की, भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. मी देवाला प्रार्थना करते की, भारताने हा सामना जिंकावा. देशवासियांना अभिमान वाटला पाहिजे. आपण सर्व जण मिळून विजयाचा आनंद साजरा करू. हा दिवस आमच्यासाठी खास आहे. आज आमची मुलगी परी हिचा वाढदिवसही आहे. तिला भारतीय संघाच्या विजयाबरोबर हा आनंद साजरा करायचा आहे.
सीमा म्हणाली की, आज माझी मुलगी परीचाही वाढदिवस आहे; जर भारताने सामना जिंकला तर तो आमच्यासाठी दुहेरी आनंद असेल. आपण संपूर्ण कुटुंबासह हा आनंद साजरा करू. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने नेहमीच रोमांचक आणि भावनिकदृष्ट्या भारलेले असतात. या सामन्याबद्दलही आम्ही प्रचंड उत्सुक आहोत.