Seema haider Pregnant: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर आपल्या प्रेमासाठी भारतात आली आणि इथलीच रहिवासी झाली. आजही तिच्याबद्दलच्या बातम्या काही थांबलेल्या नाहीत. सचिन आणि सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीची आजही चर्चा होते.
सीमा हैदर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. जेव्हा ती पाकिस्तानमधून भारतामध्ये दाखल झाली, त्यावेळचे अनेक व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केले. इतकेच नाही तर तिचा पती सचिनबरोबरही धमाल करतानाचे व्हिडीओ ती कायम शेअर करत असते. आता सीमा हैदरचा एक नवीन व्हिडीओ चर्चेत आला आहे. तिने सगळ्यांबरोबर एक गुड न्यूज शेअर केली आहे. नेमकी काय गुड न्यूज आहे ही, जाणून घेऊ या…
सीमा हैदरने दिली गुड न्यूज
सीमा हैदरने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबद्दल सांगितले. या व्हिडीओत ती प्रेग्नेंसी किट दाखवत आपल्या पतीला ही गुड न्यूज दिली. तर एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली- “मी सात महिन्यांची गरोदर आहे. आमच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे.” पुरावा म्हणून सीमाने तिचा बेबी बंपही दाखवला. तसंच ती म्हणाली की, “मुलाला वाईट नजर लागू नये म्हणून आम्ही ही गोष्ट आतापर्यंत लपवून ठेवली होती. जेव्हा सर्व काही ठीक असेल तेव्हाच आम्हाला ते जाहीर करायचे होते.”
ही गुड न्यूज तिने तिच्या पतीला म्हणजेच सचिनलादेखील सांगितली आणि दोघांनीही याबद्दल आनंद व्यक्त करत अनेक व्हिडीओ शेअर केले.
सीमा आणि सचिनचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, व्हिडीओ त्यांनी बनवला आहे पण लाज मला वाटतेय. तर दुसऱ्याने “निर्लज्जपणाचीसुद्धा मर्यादा असते” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “सचिनला विश्वासच बसत नाहीय की तो पिता बनणार आहे, काहीतरी गडबड आहे.” तर अनेकांनी अभिनंदन करत, तर काहींनी ‘क्या है सचिन में’असा डायलॉग मारत कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा… चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्…, खेळता खेळता खेळता घडली दुर्घटना! पाहा धक्कादायक VIDEO
दरम्यान, या वर्षी मे महिन्यात नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावात प्रियकर सचिन मीनासोबत राहते. तिच्या पहिल्या पतीपासून तिला चार मुलं होती, तीदेखील तिच्यासोबत राहतात. बेकायदा भारतात आल्याबद्दल जुलैमध्ये सीमाला अटक करण्यात आली होती, ती सध्या जामिनावर आहे. तिची अद्याप पोलिस चौकशी सुरू आहे. दुसरीकडे तिने भारतीय नागरिकत्वासाठी राष्ट्रपतींसमोर याचिकाही दाखल केली आहे.