Seema Haider Sends Rakhi To Modi- Shah: भारतीय प्रियकर सचिन मीणासाठी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडणारी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर ही मागील कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. कधी सीमाला शेजाऱ्यांनी ट्रोल करण्यावरून तर कधी सीमाने वाचून दाखवलेल्या गरिबीच्या पाढ्यावरून कित्येक वेळा सीमा व सचिनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता तर सीमा व सचिनच्या प्रेमकहाणीवर आधारित चित्रपट करण्यापासून ते त्यांना नोकरीला ठेवण्यापर्यंत अनेक ऑफर सुद्धा या दोघांकडे येत आहेत. अलीकडेच सीमाने चित्रपटाची ऑफर नाकारली असली तरी तिचे रोजचे एकापेक्षा एक स्टंट सुद्धा फिल्मी ट्विस्टपेक्षा कमी नाही हे ही तितकंच खरं आहे.

आज एक व्हिडीओ पोस्ट करून सीमा हैदरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना राखी पाठवत असल्याचे सांगितले आहे. एवढंच नाही तर तिने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा राखी धाडली आहे.सीमा हैदरने एक व्हिडिओ पोस्ट करून राखी कुरियर केल्याचे सांगत पोस्टल स्लिप सुद्धा दाखवली.

hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत
Former Shiv Sena MLA Uddhav Thackeray Sanjay Ghatge is on the way to join BJP
कागलमध्ये घाटगे विरुद्ध घाटगे

ज्या लोकांच्या खांद्यावर देशाची जबाबदारी आहे त्यांच्या हातात रक्षाबंधनाच्या दिवशीच राखी बांधली जावी म्हणून आजच राख्या पाठवत असल्याचे सुद्धा सीमा हैदरने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अर्थच सीमाचा हा स्टंट सुद्धा प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी सीमाने केलेल्या तयारीची काहीजण थट्टा करत आहेत, चार नावं सुद्धा हिला लक्षात राहात नाहीत असे दाखवण्यासाठी व्हिडिओची स्क्रिप्ट लिहून आणली आहे असेही काहीजण म्हणतायत. आता याचं कारण काय हे तुम्हीच पाहा.

Video: सीमा हैदर होणार मोदींची बहीण?

हे ही वाचा<< सीमा हैदर व सचिनला मिळाली नोकरीची ऑफर; महिन्याचा पगार वाचून नातेवाईकही थक्क

सीमा, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील असून, ती देशात आल्यापासून ‘तीज’, ‘नाग पंचमी’ यासह हिंदू सण साजरे करत आहे. तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी १५ ऑगस्टला सीमाने तिचे वकील एपी सिंह यांच्यासह नोएडा येथील तिच्या निवासस्थानी तिरंगा फडकावत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा दिल्या होत्या. आता रक्षाबंधनासाठी सुद्धा तिने जोरदार तयारी सुरु केली आहे.

Story img Loader