Seema Haider viral video: प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, असं म्हणत पाकिस्तानची सीमा हैदर आपल्या चार लेकरांना सोडून दोन्ही देशांची सीमा ओलांडत पाकिस्तानातून भारतात आली. पब्जी खेळत असताना झालेल्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं अन् सचिनसाठी घरदार सोडून सीमाने प्रेमाची परिसीमा ओलांडली. सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर बनून भारतात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे आता सीमा हैदर आहे तरी कोण? असा सवाल आता विचारला जात आहे. अशातच आता सीमा हैदरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडिओमध्ये सीमा हैदर बंद खोलीत डान्स करताना दिसत आहे. सीमाने साडी नेसलेली आहे. यासोबतच डोक्यावर पदरही घेतला असून चेहरा झाकला आहे. घुसखोरीच्या वादातही ती बेफिकीरपणे नाचते आहे जणू काही झालेच नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सीमा काही महिलांसोबत बंद खोलीत नाचत आहे. तेथे उपस्थित महिला तिच्या डोक्यावरुन पैसे फिरवत आहेत.

सीमाचा डान्स पाहून यूजर्सही हैराण झाले आहेत. काही यूजर्सनी सीमाच्या डान्सचे कौतुक केले आहे, तर काही यूजर्स व्हिडिओ पाहून संतापले आहेत आणि तिला पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी करत आहेत. एका यूजरने ‘तुम्ही चांगला डान्स करता’ असे म्हटले आहे. तर दुसरा म्हणाला, ‘आधी बेकायदेशीर लोकांना देशातून हाकलून द्या, मग सीमेवर बोला. तिचा नवरा भारतीय आहे, त्यामुळे तीही आता भारतीय झाली आहे. त्यामुळेच आता कुठेही जाणार नाही. दुसऱ्या युजरने म्हटले, ‘प्रथम त्याला पाकिस्तानला परत पाठवा.’

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ह्रदयद्रावक घटना! ट्रकने तरुणीला स्कूटीसकट चिरडले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सीमा हैदर काही वाईट हेतूने भारतात आल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत. इतकंच नाही तर काहींनी सीमाला पाकिस्तानी गुप्तहेरही म्हटलं आहे. त्याशिवाय, सीमा हैदर पाकिस्तानी लष्करातील मेजर सामिया रहमान असल्याचंही म्हटलं जात आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seema haider video with sachin meena goes viral on social media india pakistan love story who came to india from pakistan trending today srk