भारतीय क्रिकेटविश्वात सचिन, सौरव, धोनी, द्रवीडसारखी मोठे प्लेअर्स झाले. त्यांना देशात अाणि जगात अफाट लोकप्रियता मिळाली. भारतीय क्रिकेटमध्ये इतरही अशी नावं आहेत की जी खेळाडू म्हणून प्रसिध्द आहेतच शिवाय बाकीही कारणांमुळे ती चर्चेत राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यातलंच एक नाव आहे ते म्हणजे पार्थिव पटेल. धड मिशीही न आलेला पार्थिव पटेल २००३ साली भारताच्या नॅशनल क्रिकेट टीममध्ये सिलेक्ट झाला तेव्हा भल्याभल्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यावेळी तर भारतीय संघाची ‘गोल्डन जनरेशन’ फाॅर्ममध्ये होती. तेव्हा या सगळ्या देवांच्या बरोबरीने खेळायला आलेला हा कोण पोरगा असं म्हणत पार्थिव पटेलकडे सगळ्यांनी पाहिलं. त्याने धडपडत का होईना आपलं आंतरराष्ट्रीय करिअर सुरू केलं खरं. पण पुरेसा अनुभव गाठीशी नसल्याने त्याला सुरूवातीला म्हणावा तसा जम बसवता आला नाही. कालांतराने त्याच्या खेळामध्ये सुधारणा झाली.

सध्या पार्थिव पटेल गुजरातच्या रणजी टीमचं नेतृत्व करतो. पण त्याच्यावर असलेला ‘बच्चा’ चा शिक्का अजूनही पुसला गेला नाहीये. ९ मार्चला पार्थिव पटेलचा वाढदिवस होता. त्यावेळी वीरेंदर सेहवागने पार्थिव पटेलला ट्विटरवरून मजेदार पध्दतीने शुभेच्छा दिल्या.

पार्थिव पटेलला ‘छोटा चेतन’ म्हणत ‘अंडर-१९’ टीममध्ये खेळण्याची तुला कायम संधी मिळेल असा ‘नन्हा मुन्हा’ रहा’ असं म्हणत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि आपल्या या ट्वीटमध्ये ‘शक्तिमान’च्या वेशातल्आ छोट्या मुलाचा फोटो टाकत त्याने धमाल उडवून दिली

आपल्या सीनीयर खेळाडूच्या या शुभेच्छांचा स्वीकार पार्थिव पटेलनेही ‘हो मी नेहमीच अंडर १९ राहण्याचा प्रयत्न करेन’ असं खिलाडूवृत्तीने केला.

काही गोष्टी कधीच बदलणार नाहीत!