शाळेत अनेकदा निबंध लिहिण्याची स्पर्धा ठेवली जाते किंवा लहान मुलांना सराव व्हावा म्हणून त्यांच्याकडून काही विषयांवर निबंध लिहून घेतले जातात.
तुमची आवडती व्यक्ती कोण ? असा निबंधाचा विषय असेल तर आपल्यातील अनेक जण आई-बाबा किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल नक्कीच निबंध लिहितील. पण, आज एका चिमुकलीने या विषयवार स्वतःसाठी निबंध लिहिला आहे ; जे पाहून तुम्ही तिचं कौतुक कराल एवढं नक्की…

एका चिमुकलीला ‘माय फेव्हरेट पर्सन’ म्हणजेच माझी आवडती व्यक्ती या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितला जातो. तर ही चिमुकली दुसऱ्या, तिसऱ्या व्यक्तीला न निवडता स्वतःला या विषयासाठी पात्र समजते आणि स्वतःबद्दल या निबंधात माहिती लिहिते. जेव्हा आई हा निबंध बघते तेव्हा तिलाही आश्चर्य वाटते. काय लिहिलं आहे या निबंधात चला पोस्टमधून पाहुयात.

हेही वाचा…VIDEO: “तुम्ही माझ्यावर मरता म्हणून पुढच्या वर्षी…” नॅशनल क्रिएटर्स अवार्ड्समध्ये मोदींची गॅरंटी; इन्फ्लुएन्सर ओरडू लागले…

पोस्ट नक्की बघा…

तर या चिमुकलीने निबंधात लिहिलं आहे की, आय लाईक मायसेल्फ म्हणजेच मी स्वतःची आवडती आहे कारण – मी क्रीडादिना मध्ये खूप चांगली निवेदन करते आणि मी स्वतंत्र आहे. मला ओरडायला आणि चित्र काढायला खूप आवडते. मला जास्त वेळ बसमध्ये थांबायला आवडत नाही. कारण – मला काही सेकंदात शाळेत पोहचायला आवडते. मी डायनोसॉरचा इतिहास ऐकताना ओह अशी प्रतिक्रिया देते कारण त्या गोष्टी इतक्या मनोरंजक नसतात ; अशा मजेशीर गोष्टी या निबंधात चिमुकलीने लिहिल्या आहेत.

चिमुकलीचं स्वतःवर असणार प्रेम पाहून आईलाही खूप आश्चर्य वाटते आणि ती या निबंधाचा एक फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करते. तसेच कॅप्शनमध्ये लिहिते की, “आवडत्या व्यक्तीबद्दल निबंध लिहायचा होता आणि माझ्या मुलीने स्वतःला निवडले. मला आशा होती की, मला निवडेल. तिने इतर कोणाला निवडलं असते तर मला राग आला असता. पण, हे माझ्या कल्पनेपेक्षा खूप चांगलं आहे” ; अशी आईने या पोस्टला कॅप्शन दिली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @Full_Meals या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. चिमुकलीने लिहिलेला हा निबंध पाहून नेटकरी विविध शब्दात तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

Story img Loader