तुमच्या कॉलेज, ऑफिस, फॅमिली ग्रुपमध्ये सेल्फीचे वेड नसलेला क्वचितच एखादा सापडेल. या सेल्फी वेडाने आपल्याला इतके झपाटले आहे की दिवसाला एकतरी सेल्फी काढला नाही की चुकल्यासारखे वाटते. आता या सेल्फीची क्रेझ इतकी वाढली आहे की सेल्फीचे वेगवेगळे प्रकारही येऊ लागले. अर्थात बॉलीवूडचे अनेक स्टार जे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात यांनी सेल्फीचे वेगवेगळे ट्रेंडच सोशल मीडियावर प्रचलित केले आहेत. त्यामुळे २०१६ मधले सेल्फी ट्रेंड सेल्फी वेड्यांना माहिती असलेच पाहिजे. कदाचित यापुढे कधी सेल्फी काढताना तुमचा सेल्फी आधीपेक्षा नक्कीच हटके येऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रिझ्मा सेल्फी- आतापर्यंत आयफोन आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या प्रिझ्मा अॅप जसे अँड्राईडवर आले तसे प्रिझ्मामध्ये सेल्फी काढण्याचा जणू ट्रेंडच सुरू झाला. भलेही हे सेल्फी तुमच्या इतर सेल्फीपेक्षा आकर्षक दिसत नसले तरी यावर्षी प्रिझ्मा सेल्फीचा ट्रेंड सोशल मीडियावर होता.
नो मेकअप सेल्फी- एरव्ही पडद्यावर मेकअपमध्ये सुंदर दिसणा-या बॉलीवूडचे कलाकार जेव्हा विनामेकअप कॅमेरात कैद होतात तेव्हा मात्र त्यांचे चार चौघांत हसेच होते. पण सध्या नो मेकअप सेल्फीचा क्रेझ आहे. या ट्रेंडच्या निमित्ताने का होईना तुमच्या आवडत्या बॉलीवूड कलाकारांना त्यातूनही अभिनेत्रींना विनामेकअप पाहण्याची संधीच जणू त्यांच्या चाहत्यांना मिळाली. तेव्हा तुम्ही असे विनामेकअप सेल्फी काढून पाहू शकता पण हा पर्याय फक्त मुलींसाठीच आहे बरं का !
गेटींग रेडी सेल्फी –  मुलींमध्ये सेल्फीचा हा प्रकार जास्तच प्रसिद्ध  आहे. पार्लरमध्ये किंवा मेकओवर करताना, तयार होताना सेल्फी काढायचे यालाच गेटींग रेडी असा हॅशटॅग द्यायचा. शोऑफसाठी तर तरुणींमध्ये असे सेल्फी जास्तच प्रसिद्ध आहेत.
जीम सेल्फी- जिमिंग करतानाचा सेल्फी काढणे आणि तो सोशल मीडियावर टाकणे हा देखील २०१६ चा ट्रेंड आहे. आपण आपल्या आरोग्याची किती काळजी करतो आणि फिट अँड फाईन आहोत हे दाखवण्याचा हा सेल्फी प्रकार तसा तरुणांमध्ये  जास्तच प्रसिद्ध आहे.

त्याशिवाय मिरर सेल्फी, फनी फेस सेल्फी, वेकेशन सेल्फी असे काही प्रकार आहेत. २०१६ मध्ये ट्रेंडमध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारात तुम्ही सेल्फी काढू शकता त्यामुळे तुमचे सेल्फी हटके येतील हे नक्की.