“प्राण्यांना फक्त प्रेमाची भाषा कळते!”असे अनेकदा म्हटले जाते कारण माणसाप्रमाणे प्राण्यांना प्रेमाची आवश्यकता असते. लोक अनेकदा कुत्रा-मांजर पाळतात त्यांना आपल्या लेकरासारखं जपतात, त्यांच्यावर खूप प्रेम करतात. हे पाळीव प्राणी देखील आपल्या पालकावर तितक्या निर्मळ मनाने भरभरून प्रेम करतात. पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण सध्या व्हायरल होत असलेला गोंडस व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल. तुम्ही जर प्राणी प्रेमी असाल तर तुम्हाला हा व्हिडीओ नक्की आवडेल.

माणसांप्रमाणे प्राण्यांनाही भावना असता. पाळीव प्राण्यांचे लाड केल्यावर त्यांना आनंद होतो, आपल्या लाडक्या पालकांपासून दुर राहावे लागल्यास त्यांनाही दु:ख होते. सध्या अशाच व्हिडीओची चर्चा होत आहे ज्यामध्ये एक कुत्रा आपल्या पालकाला खूप दिवसांनंतर भेटला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये परदेशातील असल्याचे दिसते. व्हिडीओ मेट्रो स्टेशनवर शुट केलेला आहे जिथे एक छोटासा गोंडस कुत्रा आपल्या एका तरुणीकडे धावत जातो. दोघांची भेट खूप दिवसांनी झाली असल्याचे दिसते कारण तरुणीला पाहून कुत्र्याला प्रचंड आनंद झाला आहे. कारण कुत्रा धावत जाऊन तरुणीच्या अंगावर चढला आहे आणि जोरजोरात शेपूट हलवत आहे. त्याला खूप आनंद झाल्यामुळे तो आनंदाने उड्या मारताना दिसत आहे. तरुणी देखील तिच्या पाळीव कुत्र्याला पाहून खुश झाली आहे असे दिसते.

Bigg Boss 18 Fame Vivian Dsena Share Special post for wife nouran aly
Video: ‘तुम ही हो’ गाणं गात विवियन डिसेनाने पत्नीला दिली फ्लाइंग किस, अभिनेत्याचा पाहा रोमँटिक अंदाज
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
woman fed a thirsty monkey water
आधी बॅगेवर, मग बाकावर! पाण्याच्या थेंबासाठी सैरभैर झालेल्या माकडाला ‘तिने’ ओळखले; VIDEO पाहून म्हणाल माणुसकी आहे जिवंत
Beating of girlfriend by boyfriend on road
“त्याने आधी तिच्या कानाखाली मारली नंतर केस ओढले…” भररस्त्यात प्रियकराकडून प्रेयसीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याची मर्दांगी…”
video of Reunion Missing Dog and owner missing dog
Video : दोन महिन्यापूर्वी हरवलेला कुत्रा अचानक भेटला, तरुणी मिठी मारत ढसा ढसा रडली, व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
Viral Video Of pet dog
VIDEO: ‘भिंतीवर टांगून ठेवेन…’ घरात वस्तूंची फेकाफेकी करणाऱ्या श्वानाची आईने काढली खरडपट्टी; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही हसाल
rabbit and dog viral video
‘शेवटी त्याच्या जीवाचा प्रश्न होता…’ कुत्र्याच्या तावडीतून वाचण्यासाठी ससा वाऱ्याच्या वेगाने धावला; पण पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… पाहा थरारक VIDEO

हेही वाचा – “कंडक्टर नव्हे, देसी स्पायडरमॅन!” धावत्या बसमधून खाली पडणार होता तरुण, तेवढ्यात…. थरारक घटनेचा Video Viral

हेही वाचा – “स्वत:च घर गळतं असूनही पावसाची वाट पाहतो तो शेतकरी!”, पावसासाठी कवितेतून पांडुरंगाला घातलं साकडं; Viral Video बघाच

व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडीओ एक्सवर @buitengebieden नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कुत्रा आपल्या आईला पुन्हा भेटला.” व्हिडीओमध्ये कुत्रा आणि त्याची आई त्यांच्यातील प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले,”निस्वार्थ प्रेम!” दुसऱ्याने लिहिले, “हे फारचं गोंडस आहे.” तिसऱ्याने लिहिले, “त्यांचे नाते खूपच सुंदर आहे.” चौथ्याने लिहिले, “जगातील सर्वात सुंदर गोष्ट”

Story img Loader