unhygienic vegetables video : सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात बनावट भाज्याही विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कोबी कृत्रिमरीत्या कसा बनवला जातो याची प्रक्रिया दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कोबी घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…
लोकांच्या जीवाशी खेळ!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेण, पाणी व बनावट रंग वापरून चक्क कोबी तयार केला गेलाय. हे पाहून तुम्हाला जराही शंका येणार नाही असा हा कोबी दिसत आहे. हे पाहून कुणाच्याही लक्षात येणार नाही की, हा कृत्रिमरीत्या बनवलेला कोबी आहे. हा व्हिडीओ जपानमधला असून, हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, भारतातही असे प्रकार घडू शकतात.
कोबी विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या; दबक्या पावलांनी आला अन्…पाहा VIDEO
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. उद्या भारतातही हे घडलं, तर आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. हा व्हिडीओ viral_goshti या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत.