‘लालच बडी बुरी बात है!’ असं का म्हणतात याचा प्रत्यय भाजप नेते विजय जॉली यांना आलाच असेल. पाणीपुरी खाण्याचा मोह त्यांना असा महागात पडला की बिचाऱ्यांना आपला महागडा लॅपटॉप, कॅमेरा आणि महत्त्वाची कागदपत्रं गमावण्याची वेळ आलीय. त्याचं झालं असं की विजय जॉली आणि त्यांचे काही मित्र एका कार्यक्रमाला जात होते. गाडी दिल्लीच्या साकेत मेट्रो स्टेशनवर आली. या परिसरात चटपटीत चाटचं एक दुकान प्रसिद्ध आहे. या दुकानभोवती चाट खाण्यासाठी जमलेली गर्दी पाहून विजय यांनादेखील पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली नाही तर नवलच.
तेव्हा आपली गाडी पार्क करत त्यांनी या दुकानाकडे धाव घेतली. पाणीपुरी भेळ खात आपली तृप्ती त्यांनी भागवली खरी. पण हा मोह त्यांना भलताच महागात पडला. विजय यांचे लक्ष नसताना चोरांनी त्याच्या गाडीतला लॅपटॉप, कॅमेरा आणि इतर महत्त्वाची कागदपत्र चोरली. त्यामुळे जवळपास एक लाखांहून अधिक रकमेचा फटका त्यांना बसला. यावेळी त्याठिकाणी असलेल्या एका जोडप्याने ही गोष्ट लक्षात आणून देण्याचा प्रयत्नही केला पण तोपर्यंत चोर चोरी करून पसार झाले होते. तेव्हा एवढा मोठा फटका पडल्यावर पुन्हा कधी इथे चाट खाण्याचा खाणं नको असा विचार त्यांच्या मनात आला असेल हे नक्की!
वाचा : आठ वर्षांपूर्वी जिचा जीव वाचवला, तिनेच वाचवले त्या रिक्षाचालकाचे प्राण!