Viral video on social media: सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा कशाचीही चिंता न करता मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत.
@Udaipurvisit नावाच्या एका इंन्स्टाग्राम खात्यावरून ७०-८० वर्षाच्या एका व्यक्तीचा ब्रेक डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. तिथं अजून काही कलाकार डान्स करीत आहेत. ‘सजना है मुझे सजना के लिए’ या गाण्यावर आजोबांनी चांगला डान्स केला आहे. त्या व्हिडीओमध्ये काकांची स्टेप्स आणि एनर्जी दोन्हीही दिसत आहेत. कानात एअरफोन घातलेले काका कसलचं कारण नसताना बिनधास्त नाचत आहेत. आजोबांचा डान्स पाहून अनेकांनी टाळ्या वाजवल्या आहेत. एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहताना दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.