वय हा फक्त एक आकडा आहे असं म्हणतात. कोणतीही व्यक्ती त्याच्या विचाराने म्हातारी असते. एखादी गोष्ट करण्याची जिद्द आणि ध्यास मनात असेल तर वय कधीच उत्साहाच्या आड येत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या या आजोबांचा व्हिडीओ पाहा. वयाच्या या टप्प्यावरही हे आजोबा इतक्या अप्रतिम उर्जेने सालसा डान्स करतात की पाहणारे केवळ पाहतच राहतात. काही सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या ‘जगात’ वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.८ मिलियन लोकांनी पाहिलं आहे.

या व्हिडीओमध्ये आजोबा एका तरूणीसोबत सालसा डान्स करताना दिसत आहेत. यावेळी डान्स करताना आजोबांचे मूव्ह्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. हे आजोबा सोशल मीडियावरील सेलिब्रिटीच बनले आहेत. या वयातही आजोबांचा उत्साह इतका होता की व्हिडीओमधल्या तरूणी सुद्धा फिकी पडली. एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहताना दिसून येत आहे. एका पार्टीत शूट केलेला हा व्हिडीओ दिसतोय. ज्या वेगामध्ये तरूणी डान्स करतेय अगदी त्याच वेगात आजोबाही थिरकताना दिसत आहेत. हे पाहून पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी आजोबांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी एकच जल्लोष सुरू केला. हे पाहून आजोबांचा उत्साह आणखी वाढलेला दिसून येतोय. इतका की शेवटला आजोबांनी या तरूणीला थेट उचलून घेतलं. खरं तर या वयात लोक कंबरेचं दुखणं घेऊन घराच्या कोपऱ्यात बसलेले दिसतात. पण या आजोबांनी जबरदस्त डान्स परफॉर्मन्स तर केलाच पण सोबत तरूणीला एकाच प्रयत्नात उचलूनही घेतलं. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतंही दुखणं दिसलं नाही.

आणखी वाचा : VIRAL : सरकारी शाळेची दुरवस्था पाहून ग्रामसभेत मुख्याध्यापकांचा रोष

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मुलगा की मुलगी? हे जाहीर करण्यासाठी अख्खा धबधबाच निळ्या रंगाचा केला

हा व्हिडीओ goodnews_movement नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख १२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Story img Loader