१९४७ साली झालेल्या फाळणीमुळे दोन दोशच वेगळे झाले नाही तर अनेक लोकांना त्यांच्या कुटुंबापासून देखील दूर केले.परंतु, आता कर्तारपूर कॉरिडॉरवर कुटुंबापासून दूर गेलेले लोक भेटत आहेत. दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील लोकांच्या भेटीगाठी अनेकवेळा होत आहेत. कर्तारपूरमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. तब्बल ७५ वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झालेले भाऊ-बहीण कॉरिडॉरवर भेटले आहेत. यावेळी एकमेकंना पाहताच दोघांनीही आश्रू अनावर झाले. भारतातील ८१ वर्षीय महेंद्र कौर यांनी कर्तारपूर कॉरिडॉर येथे पाकव्याप्त काश्मीरमधील आपला ७८ वर्षीय भाऊ शेख अब्दुल अझीझ याची भेट घेतली. ७५ वर्षांपूर्वी फाळणीच्या वेळी हे भावंडे विभक्त झाले होते.
फाळणीदरम्यान, सरदार भजनसिंग यांचे कुटुंब पंजाबच्या भारतीय भागातून वेगळे झाले होते. अझीझ पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले तर, कुटुंबातील इतर सदस्य भारतातच राहिले. शेख अब्दुल अजीज सांगतात की, ७५ वर्षांपूर्वी कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे दुःखात व्यतीत केली. त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु कोणीही सापडले नाही. आता सोशल मिडिया पोस्टद्वारे त्यांची त्यांच्या बहिणीशी भेट झाली आहे
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भारतातील पंजाबमधील रहिवासी अमरजित सिंग यांनी त्यांची बहीण कुलसूम यांची कर्तारपूर साहिब गुरुद्वारामध्ये भेट घेतली. दोन्ही भाऊ-बहिणींनी एकमेकांना पाहिले त्यावेळी त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.