कोविड-१९ मुळे अगदी प्रत्येक देशाला आर्थिक फटका बसलेला आहे. वर्षानुवर्षे उत्तम सुरु असलेले सेक्टर कोलमडून पडली. पण आता सर्बियाला कोविड-१९ मुळे ‘Quarantine Tourism’ अर्थात विलगीकरण टुरिझमचा फायदा होत आहे. याच मुख्य कारण म्हणजे हजारो भारतीय इतर देशामध्ये जाताना मार्गावर सर्बियामध्ये दोन आठवड्यांचा स्टॉपओव्हर करतात. अमेरिका वगळता इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद भारतात आहे. त्यामुळे भारतीयांना अन्य देशात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित केले जात आहे जोपर्यंत ते दोन आठवड्याचा विलगीकरण कालावधी दुसऱ्या देशात घालवत नाहीत.
व्हिसा-मुक्त प्रवेश
सर्बिया हे भारतीयांसाठी लोकप्रिय स्टॉपओव्हर डेस्टिनेशन बनले आहे. याच कारण म्हणजे याचं लसीकरण झालं आहे आणि ज्यांची कोविड-१९ ची चाचणी नकारात्मक आली आहे त्यांना व्हिसा-मुक्त प्रवेश दिला जात आहे. लोकांना ज्या देशात जायचं आहे त्या देशाच्या अटीनुसार सर्बियामध्ये त्यांच्या मुक्कामाचे किमान पहिले सात दिवस विलगीकरणात राहावे लागेल. विलगीकरण संपल्यावर शेवटी त्यांना कोविड-१९ ची चाचणी बंधनकारक आहे. रॉयर्टसशी बोलतांना विशाखापट्टणमचा जगदीश अमेरिकेला जात असताना सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये राहिला. तो सांगतो “मी गोष्टी उघडण्यासाठी काही काळ भारतात वाट बघितली. पण गोष्टी उघडत न्हवत्या म्हणून आम्ही सर्बियाची निवड केली कारण आम्हाला तिथे व्हिसाची गरज नाही आणि हे बेलग्रेड हे सुंदर शहर आहे.”
जुलैमध्ये हजारो भारतीय बेलग्रेडमध्ये
एका हॉटेल मालकांनी रॉयर्टसशी बोलतांना सांगितले की जुलै महिन्यात हजारो भारतीय बेलग्रेडमध्ये आले. “मी याला ‘क्वारंटाईन टुरिझम’ म्हणणार नाही, पण शेवटी तेच आहे. इथे भरपूर हॉटेल आहेत जी भरलेली आहेत” मार्क ग्रुप हॉटेल्सच्या व्यवस्थापिका इलिजा स्मिलजनिक रॉयर्टसशी बोलतांना म्हणाल्या. जूनमध्ये सर्बियाने पर्यटक येण्यामध्ये ४८.४% वार्षिक वाढ नोंदवली आणि ओव्हर नाईट स्टे राहणाऱ्याच्या संख्येमध्ये ३९.३& वाढ नोंदवली असे सांख्यिकी कार्यालयाने सांगितले. यामुळे सर्बिया देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात पर्यटनाचा वाटा २.५% आहे. सर्बियाला गेल्या वर्षी कोविड-१९ च्या निर्बंधांमुळे १ अब्ज युरो पेक्षा जास्त महसुलाचे नुकसान झाले.