Himachal Pradesh : सध्या हिमाचल प्रदेशला हवामानाचा तडाखा बसला आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. शिमला, मंडीसह राज्यातील अनेक ठिकाणांहून भूस्खलनाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, जे खूपच भीतीदायक आहेत. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. याबाबत पोलीस-प्रशासन सातत्याने बचावकार्यात व्यस्त आहे.मुसळधार पावसामुळे एकट्या शिमल्यात ५०० हून अधिक झाडे पडून वाहून गेली. पायाखालची जमीन सरकरणे म्हणजे काय, हे या व्हिडीओमधून पाहायला मिळतंय.

दरम्यान, भूस्खलनाचे असे व्हिडीओ समोर येत आहेत जे पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. निसर्गाच्या कहराचा सामना करत असलेल्या शिमल्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही सेकंदात एक घर पत्त्याच्या घरासारखे कोसळले. घरा खालून अक्षरश: जमीनच सरकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. याशिवाय अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कार चालवत असलेला एक व्यक्ती भूस्खलनाचा व्हिडिओ बनवत आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याने तुडुंब भरल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. मग अचानक डोंगर कोसळून रस्त्यावर पडू लागतो. या वेळी मोठमोठ्या दगडांसह झाडेही रस्त्यावर पडली आहे.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
IShowSpeed performs daring backflip on Guatemalas Hand of God‘You have to stop risking your life for these reels
१७ सेकंदाच्या व्हिडीओसाठी युट्युबरने गमवला असता जीव! ‘हँड ऑफ गॉड’वर केली स्टंटबाजी, थरारक Video Viral
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Mumbai: Worker Attempts Suicide Twice in Vikhroli, Saved by Safety Nets After Jumping From 13th Floor video goes viral
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Butibori bridge case, Butibori bridge case,
नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील मंडीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे अतिवृष्टीमुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. यामध्ये वेगाने पाणी घरात शिरते आणि खिडक्यांमधून बाहेर येते. मग अचानक तिथली जमीनही सरकू लागते ज्यात संपूर्ण घर वाहून जाते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “तुझ्या बापाची मेट्रो आहे का?” मेट्रोमध्ये महिलांची हाणामारी; VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आणखी एक व्हिडिओ देखील खूप धोकादायक आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती घरात पडलेल्या भेगा शूट करत आहे. घराच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आणि मग अचानक घर कोसळू लागल्याचे दिसून येते. हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे प्राण गेले. त्याचबरोबर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर भारतात पावसाने हाहाकार उडविल्याने देशभरातील हजारो पर्यटक हिमाचलप्रदेशात अडकले आहेत. हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देशभरातून दरवर्षी पर्यटक येत असतात. यंदाच्या वर्षीही पर्यटक कुलू, मनाली, कसोल, मंडी आदी भागात पर्यटनासाठी गेले आहेत. मात्र, त्या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्यटक तेथे अडकून पडले आहेत

Story img Loader