Bees Attack at Wedding Ceremony: अनेकदा भटकंती किंवा पर्यटनासाठी गेलेल्या व्यक्तींवर मधमाश्यांचा हल्ला झाल्याची बातमी आपण ऐकतो. हा हल्ला तीव्र असेल तर यामध्ये काही जणांचा जीव देखील गेला आहे. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कुठल्या पर्यटनस्थळी नाहीतर चक्क लग्न समारंभात मधमाशांनी पाहुण्यांवर हल्ला केला आहे. अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडं असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बऱ्याचदा या मधमाशा एकत्र झुंडीनं सगऴीकडे हल्ले देखील करतात. असाच हल्ला या लग्नसमारंभात झालां.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एक विचित्र प्रसंग घडला ज्यामुळे लग्नात मोठी धावपळ उडाली. इतकी की काही काळ लग्नसोहळाही विस्कळीत झाला. लग्नाच्या मांडवात विवाहासाठी पाहुणे मंडली उपस्थित होती. नवरा नवरी वरमाला घालण्याच्या क्षणाची वाट पाहात होती. सर्व काही विधीवत आणि शांततेत पार पडत होते. इतक्यात, मंडपात मोठी धावपळ उडाली. लोक सैरावैरा धावू लागले. विवाहातील उपस्थितांवर मधमाशांनी हल्ला चढवला. ज्यामुळे वऱ्हाडी सैरावरा धवू लागले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान, हॉटेलच्या छतावर असलेल्या मधमाशांच्या पोळे अचानक खाली पडले. त्यामुळे पोळ्यावर असलेल्या माशा चिडल्या आणि त्यांनी आलेल्या पाहुण्यांवर हल्ला केला. मधमाशा इतक्या आक्रमक होत्या की या घटनेत किमान १२ पाहुणे जखमी झाले आहेत. काही पाहुण्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: चित्तथरारक! चोर पुढे पुढे आणि पोलीस मागे मागे; शेवटी चोरानं नदीत घेतली उडी अन्…शेवट पाहून व्हाल अवाक्

 दरम्यान, या घटनेमुळे हाटेल प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. हॉटेल प्रशासनाने आपला हॉल समारंभांना भाड्याने देण्यापूर्वी सुरक्षेची खात्री का केली नाही, असा प्रश्न उपस्तित होत आहे. मधमशांच्या हल्ल्यासारख्या घटना टाळण्यासाठी आणि कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का याचा अधिकारी तपास करत आहेत.