दिल्ली-एनसीआरमध्ये आज मंगळवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. हे भूकंपाचे धक्के भारत, पाकिस्तान आणि चीनमध्येदेखील जाणवले आहेत. भूकंपाचं केंद्र जम्मू काश्मीरचं डोडा हे असून रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या झटक्यांची तीव्रता ५.४ इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली असतानाच सोशल मीडियावर मात्र मिम्सचा महापूर आला आहे. काही नेटकऱ्यांनी भूकंपाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत तर तर काहींनी त्यावर मजेदार मीम्स शेअर केले आहेत.
युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) ने सांगितले की, पूर्व काश्मीरमध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजता भूकंप झाला. प्राथमिक अहवालानुसार, भूकंप जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील गंडोह भलेसा गावापासून १८ किमी लांब आणि ३० किमी खोली अंतरावर झाला. जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीत भूकंपाचे फारसे जोरदार धक्के जाणवले नसले तरी काही लोकांना त्याची जाणीवही झाली नाही, पण ट्विटरवर मात्र मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
मजेदार मीम्स व्हायरल –
एका ट्विटर यूजरने ग्रेट खलीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये खली एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मारहाण होत असलेल्या व्यक्तीला दिल्ली आणि खली हे टेक्टोनिक प्लेट्स असल्याचे सांगण्यात आले, जे दिल्लीला हादरे देत आहे.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा फोटो पोस्ट करताना एका व्यक्तीने लिहिले की, ‘हो, हे आधी करा’. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “भूकंपादरम्यान जीव वाचवायचा सोडून लोक ट्विटरवर पोस्ट करत आहेत.”
त्याचवेळी एका ट्विटर युजरने आपल्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवलेला मॉनिटर आणि पाण्याचा ग्लास भूकंपाच्या वेळी हलताना दाखवला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ऑफिसमध्ये भूकंप.’
भूकंपादरम्यान दिल्लीचे लोक –