Pope Fransis Praises Sex: बुधवारी प्रसिद्ध झालेल्या माहितीपटात पोप फ्रान्सिस यांनी सेक्स या विषयाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. सेक्सचे वर्णन करताना ८६ वर्षीय पोप फ्रान्सिस सांगतात की, “देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी एक सेक्स आहे.” डिस्ने+ ची डॉक्युमेंट्री ‘पोप आन्सर्स’मध्ये, गेल्या वर्षी वयाच्या विशीत असलेल्या १० लोकांसह रोममध्ये झालेल्या मीटिंगचे अनुभव शेअर केले आहेत. या डॉक्युमेंट्रीमध्ये पोप फ्रान्सिस यांनी एलजीबीटी अधिकार, गर्भपात, पॉर्न, सेक्स, विश्वास आणि लैंगिक अत्याचार यासह विविध विषयांवरील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
पोप फ्रान्सिस यांनी हस्तमैथुनाचा संदर्भ देत सांगितले की, “स्वतःला सेक्श्युअली व्यक्त करणे ही एक समृद्धता आहे. त्यामुळे वास्तविक सेक्श्युअल भावनांपासून विचलित होणारी कोणतीही गोष्ट तुम्हाला लाभलेली समृद्धी कमी करते.”
नॉन-बायनरी व्यक्ती म्हणजे काय हे माहीत आहे का असा प्रश्न विचारताच पोपने एलजीबीटी समूहाचे कॅथोलिक चर्चने स्वागत केले पाहिजे, सर्व व्यक्ती देवाची मुले आहेत, देव कोणाला नाकारत नाही, देव पिता आहे. आणि मला कोणालाही चर्चमधून काढून टाकण्याचा अधिकार नाही अशी भूमिका मांडली. गर्भपातावर, फ्रान्सिस म्हणाले की, “गर्भधारणा संपुष्टात आणलेल्या स्त्रियांबद्दल धर्मगुरूंनी दयाळू भाव ठेवायला हवा. परंतु ही प्रथा अस्वीकार्य आहे.”
हे ही वाचा<< डिग्रीपेक्षा त्यांचं डोकं भारी! हापशीतून पाणी काढण्यासाठी केलेला जुगाड Video पाहून व्हाल थक्क
दरम्यान, पोप यांची विधाने L’Osservatore Romano, या अधिकृत व्हॅटिकन वृत्तपत्राने प्रकाशित केली होती, यावर वाचकांनीसुद्धा पोप यांचे वक्तव्य खुलेपणाचे, प्रामाणिकपणाचे उदाहरण आहे असे मत मांडले आहे.