माकडाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी इजिप्तच्या एका न्यायालयाने एका 25 वर्षीय महिलेला दोषी ठरवलं आहे. बस्मा अहमद असं या महिलेचं नाव असून कोर्टाने 3 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
ऑक्टोबर महिन्यात 90 सेकंदाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बस्मा अहमद हिला अटक करण्यात आली होती. पाळीव प्राण्यांच्या दुकानात असताना ती एका माकडाच्या गुप्तांगाला स्पर्श करताना आणि हसताना व्हिडीओत दिसत होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली या महिलेला अटक करण्यात आली होती.
न्यायालयात महिलेने आपला गुन्हा कबुल केला, मात्र माझा असा कोणताही उद्देश नव्हता असंही तिने स्पष्ट केलं. तसंच एका मैत्रिणीने व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि न सांगता इंटरनेटवर अपलोड केल्याचं तिने न्यायालयात सांगितलं. मात्र, संबंधित महिलेने पहिल्यांदाच असं कृत्य केलेलं नाही यापूर्वी दोन वेळेस तिच्यावर अनैतिकतेचे आरोप झाले आहेत असा युक्तिवाद तिच्याविरोधात करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने तिला दोषी ठरवलं आणि तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.