Todays Viral Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जवान चित्रपट पाहण्यासाठी अजूनही लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच शाहरुखच्या एका जबरा फॅनचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण शाहरुखच्या चाहत्याने चक्क व्हेटिंलेटरवर असताना जवान चित्रपट पाहिला. जबरा फॅनचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
ट्वीटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, शाहरुख खानच्या एका चाहत्याने व्हेंटिलेटरच्या मशिनवर बसून चित्रपटगृहात जवान फिल्म पाहिली. अनीस फारुखी असं शाहरुखच्या चाहत्याचं नाव असून तो दिव्यांग आहे. गेल्या काही दिवसांपासून तो व्हेंटिलेटरवरच आहे. पण जवान चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात जाऊन तो पाहण्याची अनीसची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. व्हेंटिलेटरवर असतानाही अनीस चित्रपटगृहात पोहोचला आणि शाहरुखचा हा सिनेमा पाहिला. अनीसने त्याच्या कुटुंबियांसाठी स्पेशल स्क्रीनिंग करून त्यांना चित्रपट दाखवला. याचदरम्यान संपूर्ण चित्रपटगृह रिकामा होता. त्यामुळे अनीसला शाहरुखचा हा चित्रपट आरामात पाहता आला.
इथे पाहा व्हिडीओ
पठाणनंतर जवान यशाच्या शिखरावर
गतवर्षी शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखने कमबॅक केलं होतं. यानंतर जवान चित्रपटाकडे कोट्यावधी लोकांचं लक्ष लागून राहिलं होतं. एटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानचा बोल्ड अंदाजही दाखवण्यात आला आहे. चित्रपटाने ६०० कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे. यानंतर आता शाहरुखच्या डंकी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.