शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर पठाण सिनेमा आज जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका एका चित्रपटगृहात प्रेक्षकांनी झुमे जो पठाण गाणं सुरु होताच जल्लोष सुरु केला. स्क्रीनवर सिनेमा सुरु असतानाच शाहरुख खानच्या चाहत्यांना पठाणची भुरळ पडली आणि टाळ्यांसह शिट्ट्यांचा गजर वाजू लागला. प्रेक्षकांनी सिनेमाला जबदस्त प्रतिसाद दिल्याचं ट्वीटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
केजीएफ २, बाहुबली सिनेमानंतर आता पठाणही बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जॉन अब्राहमनेही पठाणमध्ये महत्वाची भूमिका साकारल्याने त्याचा थरारक अंदाज पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. काही चित्रपटगृहांमध्ये सकाळी ६ वाजताच या सिनेमाचा शो सुरु करण्यात आला होता. सलमान खानचाही एक छोटासा कॅमियो या सिनेमात दाखवण्यात आला आहे. पठाण सिनेमातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत.
इथे पाह व्हिडीओ
कारण सिनेमा सुरु झाल्यानंतर थेट चित्रपटगृहाच्या स्कीनजवळ जाऊन प्रेक्षकांनी एखाद्या सिनेमासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जल्लोष केल्याचं क्वचितच कधी पाहिलं असेल. पण पठाण सिनेमा दिवसेंदिवस चाहत्यांच्या गळ्यातील ताईतच बनला असावा, असंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणता येईल. पठाण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतप मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये काही समाजकंटकांनी शो बंद केला होता. मात्र, लोकांचा विरोध कमी झाल्यावर दुपारच्या सत्रात या सिनेमाचा शो सुरु झाला असल्याची माहिती समोर आली. गेल्या तीन-चार वर्षांनंतर अभिनेता शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकला आहे. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी काही ठिकाणी चाहत्यांच्या रांगा लागल्याचं चित्र निर्माण झालं होतं.