पृथ्वीवरील निवासी भागात घाण आणि कचरा करणे लोकांसाठी आता सामान्य आहे. लोक अनेकदा सर्वत्र कचरा टाकत असतात. स्वच्छतेबाबत विविध मोहिमाही राबवल्या जातात. परंतु, आता लोक हे चुकीचे वर्तन, माउंट एव्हरेस्ट सारख्या उंच पर्वत रांगेवरही करू लागला आहे. अलीकडेच, माउंट एव्हरेस्टसह चार पर्वतांवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान, स्वच्छता टीमला सुमारे ३३.८ टन कचरा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिपोर्टनुसार, ५ एप्रिल रोजी नेपाळ आर्मीच्या नेतृत्वात ‘सफा अभियान २०२२’ सुरू करण्यात आले. नेपाळ आर्मी आणि शेर्पा यांच्या संयुक्त टीमने चालवलेल्या या मोहिमेचा समारोप ५ जून २०२२ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाला. या मोहिमेत टीमने माउंट एव्हरेस्ट, ल्होत्से, कांगचेनजंगा आणि मनास्लू येथून ३३,८७७ किलो कचरा गोळा केला.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

या ऑपरेशनमध्ये लष्कराचे ३० जवान, ४८ शेर्पा आणि ४ डॉक्टरांचाही सहभाग होता. मोहीम संपल्यानंतर नेपाळचे लष्करप्रमुख प्रभू राम शर्मा म्हणाले की, पर्यावरणाची सातत्याने हानी होत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा मोहिमेची गरज आहे. त्याचवेळी, ही मोहीम राबविणाऱ्या टीमने सांगितले की, संपूर्ण मोहिमेत आम्हाला दोन प्रकारचा कचरा (जैवविघटनशील आणि नॉन-बायोडिग्रेडेबल) आढळून आला आहे. टीमने माहिती दिली की माउंट एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखरे साफ करण्यासाठी ५५ दिवस लागले, तर कंचनजंगा आणि मनास्लूमध्ये अनुक्रमे ४४ आणि ४३ दिवस लागले.

ही विशेष स्वच्छता मोहीम २०१९ मध्ये सुरू करण्यात आल्याचे टीमने सांगितले. पहिल्या वर्षी या चार पर्वतरांगांमधून सुमारे १० टन कचरा बाहेर पडला. २०२० मध्ये कोरोनामुळे मोहीम सुरू होऊ शकली नाही. २०२१ मध्ये चार डोंगरांमधून सुमारे २७ टन कचरा बाहेर आला.