जगभरात गुरूला आई-वडिलांपेक्षा मोठे स्थान दिले जाते. पण अमेरिकेतील एका हायस्कूलमध्ये गुरू-शिष्याच्या परंपरेला लाजविणारी घटना घडली. कालहाउन काउंटीच्या शाळेतील एका मुलीने शिक्षकासोबत अतिशय वाईट व्यवहार केला. वर्गामध्ये शिक्षक येताच विद्यार्थीनीने थेट टेबलवर चढत शिक्षकाला लाथ व चापट मारली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित विद्यार्थीनीला निलंबित करण्यात आले आहे. लिनेरिया लिन ग्रोवर असे या मुलीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कालहाउन काउंटीमध्ये घडलेल्या या घटनेच्या सोशल माध्यमावरील व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला. विद्यार्थीनीची वागणूक अतिशय चूकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे वर्गामध्ये शिक्षकासोबत ही घटना घडत असताना इतर विद्यार्थी त्यावर हसत होते. वर्गामध्ये शिक्षक येताच एका मुलगी उठून थेट टेबलवर चढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर तिने शिक्षकाला ताथा मारण्यास सुरूवात केली. शिक्षकाने कुठलेही प्रत्युत्तर न देता बाजूला होणे योग्य समजले. पण यानंतर विद्यार्थीनी थेट शिक्षकाच्या खुर्चीत जावून बसली. इतकेच नाही तर थाटात तिने आपले पाय पुढील टेबलवर ठेवले.

या घटनेनंतर १७ वर्षीय ग्रोवरला शाळेने निलंबित केल्याचे वृत्त आहे. सोशल माध्यमांवरून देखील अनेकांनी तिला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. लिनेरियावर सार्वजनिक अवमानजनक वागणूक व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी तिला एका महिन्याचा तुरुंगवास देखील होवू शकतो.