Shantanu Naidu Viral Video : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (वय ८६) यांनी बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या स्मशानभूमीत नेले जात असताना, रतन टाटा यांचा जवळचा मित्र आणि सहकारी शंतनू नायडू त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाली होता. पण, शंतनू बाईकवरून अंत्यसंस्कारासाठी जात असताना मुंबई पोलिसांनी त्याला अडवले. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे,

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी शंतनूला त्याची ओळख आणि कुठे जायचे आहे, असे विचारताना दिसत आहेत. त्यावर शंतनूने शांतपणे सांगितले की, तो रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी जात आहे. यावेळी तो त्याचे आयडी कार्ड दाखवतो; पण पोलीस त्याला बाईक आत घेऊन जाऊ शकत नाही, असे सांगताना दिसत आहेत. अखेर शंतनू बाईक मागे घेताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये तो पोलिसांना आपली ओळख सांगतानाही दिसत आहे. प्रशांत यादव या एक्स युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला असून, कॅप्शनमध्ये लिहिले, ”जेव्हा रतन टाटा यांच्या सर्वांत जवळची व्यक्ती शंतनू नायडू याला मुंबई पोलिसांनी त्याच्याकडे ओळखीबाबत चौकशी केली. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.

Read More Ratan Tata Updates News : “दु:ख ही प्रेमाची किंमत, अलविदा…”; टाटांच्या निधनानंतर त्यांच्या ३० वर्षीय मित्राची भावनिक POST

त्याच दिवशी सकाळी शंतनूचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनानंतर तोही खूप दु:खी झाला. त्याने सोशल मीडियावर रतन टाटांविषयी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने रतन टाटांना श्रद्धांजली वाहताना लिहिलेय, “या मैत्रीनंतर आता त्यांच्या जाण्यानं माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. अलविदा, माझ्या प्रिय दीपस्तंभा (लाईटहाऊस),” अशा शब्दांत शंतनू नायडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रतन टाटा आणि शंतनूची मैत्री

शंतनू नायडूची रतन टाटांबरोबरची घनिष्ठ मैत्री त्यांचे प्राण्यांवर असलेल्या प्रेमातून फुलली. २०१४ मध्ये दोघांची भेट झाली होती. शंतनू नायडू याने रात्रीच्या वेळी भटक्या श्वानांचे कारच्या धडकेपासून संरक्षण करण्यासाठी रिफ्लेक्टिव कॉलर विकसित केली. शंतनूने भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराने प्रभावित होऊन, रतन टाटा यांनी त्याच्याबरोबर काम करण्यासाठी त्याला आमंत्रित केले.

टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी रतन टाटांना वाहिली अनोखी श्रद्धांजली! श्वानाची ‘ती’ कृती पाहून उपस्थितही झाले भावूक; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

गेल्या १० वर्षांत शंतनू नायडू रतन टाटा यांचा जवळचा आणि विश्वासू मित्र बनला; गेल्या काही वर्षांमध्ये रतन टाटा यांच्याबरोबर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शंतनू नायडू दिसायचा.