सध्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. सोशल मीडियापासून ते विकिपीडियापर्यंत निवडणुकीचा रंग चढला आहे. प्रत्येक पक्ष आपला प्रचार करण्यात व्यस्त आहे. अशामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईलसोबत छेछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा उल्लेख त्यांच्या प्रोफाईलवर करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तीने पवार यांच्या विकिपीडिया प्रोफाईलशी छेडछाड केली आहे.
पवार यांच्या प्रोफाईलशी छेडछाड झाल्याचे समोर येताच पुन्हा कोणीतरी त्यांचा उल्लेख देशातील सर्वात इमानदार नेता असा केला.
२४ तासांच्या आत शरद पवार यांच्या प्रोफाईल तीन वेळा बदलण्यात आली आहे. अपडेट प्रोफाईलमध्ये त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध नेता असा उल्लेख विकिपीडियावर करण्यात आला आहे. काही नेटीझन्सनी ट्विटरवर याबाबत आपले मत व्यक्तही केले आहे.
विकिपीडियावरील माहितीत कुणालाही बदल करता येतात त्यामुळे हा प्रकार घडला. याआधीही अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबत हा प्रकार घडला होता. विकिपीडियावरील छेडछाड सध्या दुरूस्त करण्यात आली आहे. मात्र या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.
शरद पवार सर्वाधिक भ्रष्टाचारी राजकारणी : विकीपीडिया
..
सिंबातला डायलॉग आठवला..Tell Me Something That I Don’t Know #राराम्हणे— Rahul Rajopadhye (@_R_A_H_U_L) March 26, 2019
शरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते! विकिपीडियाच्या माहितीने खळबळ pic.twitter.com/Px5e0hnKnH
— BHARAT