सध्याचा काळ हा डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे ज्या लोकांकडे टॅलेंट आहे, काही वेगळं करुन दाखवण्याची क्षमता आहे. त्यांची दखल घेतली जातेच, याबाबतचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. एका विद्यार्थ्याला ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळू शकला नाही, त्याच कॉलेजमध्ये त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावल्याची घटना समोर आली आहे. याबाबत त्या विद्यार्थ्यानेच इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरण हेगडे असं या तरुणाचे नाव असून तो सोशल मीडियावर एक प्रसिद्ध ‘फायनान्स इन्फ्लुएंसर’ म्हणून ओळखला जातो. शरणचे इंस्टाग्रामवर २ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. शरणने नुकतेच त्याच्या जीवनातील यशस्वी वाटचालीबाबतची माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे.

या पोस्टमध्ये त्याने लिहलं आहे की, “३ वर्षांपूर्वी मी कॅटच्या (CAT) परिक्षेत ९८ टक्के गुण मिळवूनही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) बंगळुरुमध्ये प्रवेश घेऊ शकलो नव्हतो. त्यावेळी या संस्थेत शिकण्याचे माझे स्वप्न अपुर्ण राहिलं होतं, म्हणून ही पदवी अमेरिकेतून घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कोलंबिया विद्यापीठात प्रवेशही घेतला, परंतु नंतर ‘कंटेंट क्रिएशन’मध्येच आपलं करियर करायचं ठरवलं आणि कोलंबिया विद्यापीठही सोडलं.”

आणखी वाचा- नशिबाचा खेळ! नवऱ्याने लॉटरीत जिंकलेले एक कोटी घेऊन बायकोचा पोबारा; प्रियकराकडे गेली अन्…

दरम्यान, शरणने ‘कंटेंट क्रिएशन’मध्ये मिळवलेल्या यशामुळेच त्याला ज्या विद्यापीठात प्रवेश मिळू शकला नव्हता, त्याच विद्यापीठात प्रमुख पाहुणा म्हणून व्याख्यान करण्याची संधी मिळाली आहे. या घटनेची माहिती देताना त्याने इंस्टाग्रामवर IIM बंगळुरुच्या कॅम्पसमधील एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, “CAT मध्ये ९८ टक्के मिळूनही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नव्हता, त्याच कॉलेजमध्ये आज मी एक प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहिलो.

माझ्या आयुष्यात मी IIM हेच सर्व काही आहे, असं म्हटलं असतं तर कदाचित मला हे यश मिळालं नसतं. तीन वर्षांपूर्वी, मी आयआयएम सोडले आणि आता त्याच IIM मध्ये मी हातात माईक घेऊन स्टेजवर बोलण्यासाठी उभा राहिलो, तेंव्हा माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे.कारण एकेकाळी मला वाटलं होतं की, CAT ची माझी तयारी म्हणजे केवळ वेळ वाया घालवणं होते. रात्रंदिवस अभ्यास करुन मी ९८ टक्के मिळवले तरी मला प्रवेश मिळू शकला नव्हता. शिवाय आयआयएम म्हणजेच सर्वकाही त्यापलिकडे काही नाहीये अशी माझी गैरसमजूत झाली होती. मात्र, ती माझी मोठी चूक असल्याचं आता जाणवलं.

काही मित्रांच्या सल्लाने मी एमबीए करण्याचं ठरवलं आणि कोलंबियामध्ये शिकण्यासाठी गेलो, पण तेथूनही मी बाहेर पडलो आणि शेवटी मला जे करायचं आहे तेच केलं. ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावं माझं स्वप्न होतं त्याच कॉलेजमध्ये आज मी आलो आहे. आयुष्य हे एक चक्र असून आपल्या आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडतं.

आपण फक्त आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींकडे वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला हवं. त्यातूनच आपलं आयुष्य घडतं असतं. त्यामुळे खूप मेहनत करा, वेळ तुमची आहे.” असा सकारात्मक संदेश शरण याने त्याच्या पोस्टमधून इतर विद्यार्थ्यांना दिला आहे. शिवाय “आयुष्यात तुम्हाला स्वत:च्या कर्तुत्वावर विश्वास असेल तर जगात काहीच अशक्य नसतं, हेच या घटनेवरुन समजतं” अशा कंमेंट नेटकऱ्यांनी शरणच्या पोस्टवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharan hegde influencer is guest lecturer at the iim bangalore he couldnt get in jap
Show comments