Happy Mothers Day 2023: आई हा शब्द करुणा, प्रेम, धैर्य आणि दयाळूपणा दर्शवतो. आई क्षमाशील, निस्वार्थी असते हे सांगण्याची गरज नाही. कारण प्रत्येकाची आई आपल्या मुलांना जीवापाड जपत असते, मुलांच्या सुखासाठी ती स्वत:चं आयुष्य झिजवत असते. आई ही प्रत्येकाच्या जीवनाचा आधारस्तंभ असते. अशा या आईच्या उपकाराची जाणीव ठेवून जगभरात मातृत्व आणि मातांचा सन्मान करण्यासाठी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. यंदाचा म्हणजेच २०२३ चा ‘मदर्स डे’ उद्या १४ मे रोजी साजरा केला जाणार आहे. ‘मदर्स डे’निमित्त आपण आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो.

सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येकजण सोशल मीडियावर आपापल्या आईविषयीच्या भावना व्यक्त करत असतो. अनेकजण व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून तर कोणी ट्विटर इंस्टाग्रामवरुन ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नेमकं काय लिहावं हेच अनेकांना सुचत नाही. यासाठीच आम्ही तुम्हाला आईला ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा देऊन तिचा दिवस खास करण्यासाठी थोरामोठ्यांचे सुंदर विचार, Quotes आणि संदेश घेऊन आलो आहोत. या मेसेजच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आईला शुभेच्छा देऊन खुश करु शकता. तसेच जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या या मदर्स डे चे महत्व आणि त्याची सुरुवात कशी झाली हे देखील सांगणार आहोत.

happy rose day wishes in marathi | rose day quotes and images
Happy Rose Day 2025 : “तू गुलाबासारखी नाजूक…” प्रिय व्यक्तीला पाठवा ‘रोझ डे’च्या एकापेक्षा एक प्रेमळ शुभेच्छा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
happy ratha saptami wishes
Ratha Saptami Wishes : आज रथ सप्तमीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा; पाहा यादी
Gemini Horoscope today
Gemini Horoscope Today : अचानक धनलाभाचा योग अन् नोकरी- व्यवसायात यश, मिथुन राशींच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा
2nd February 2025 Rashi Bhavishya
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?
Maghi ganesh chaturthi 2025 wishes messages quotes sms whatsapp facebook status in marathi
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
sagittarius horoscope today 30 january 2025
आज धनु राशीच्या लोकांची प्रवासाची हौस होऊ शकते पूर्ण? जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस
Libra Horoscope Today
Libra Horoscope Today : आजच्या दिवशी सावधगिरी बाळगा अन् खर्चावर नियंत्रण ठेवा; जाणून घ्या तूळ राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व.

‘चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
गोठय़ात वासरांना या चाटतात गाई,
वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा व्याकूळ मात्र होई,
नोहेचि हाक माते मारी कुणी कुठारी
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी..!!

हॅप्पी मदर्स डे..!

हजारो फुलं हवीत एक माळ बनवायला,

हजारो दिवे हवेत एक आरती सजवायला

हजारो थेंब हवेत एक समुद्र बनायला

पण आई एकटीच पुरे आहे

आपल्या लेकरांचे आयुष्य सावरायला!

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही
– फ.मुं. शिंदे

मदर्स डे’चे महत्त्व

मदर्स डे हा एक विशेष दिवस आहे जो आपल्या आईबद्दल प्रेम दर्शवण्यासाठी आईच्या उपकाराची जाणीव ठेवून तिचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

आईवरील काही निवडत कविता –

‘दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!’
– ग. दि. माडगूळकर

‘ठेच कान्हूला लागली
यशोदेच्या डोळा पाणी
राम ठुमकत चाले
कौसल्येच्या गळा पाणी,
देव झाला तान्हुला ग
कुशीत तू घ्याया,
तिथे आहेस तू आई
जिथे आहे माया!!’

– मंगेश पाडगावकर

‘माय म्हणजे एक मोठी ऊब
पोराला कवटाळणारा तिचा फाटका पदर
अडवू शकतो जगातील कोणतीही हिमलाट!
माय पुस्तकी अनपढ असली तरी
ती असते अनुभवांची अधिष्ठाता
संस्कारांची कुलगुरू नि स्वयंभू मुक्त विद्यापीठही!’

कशी झाली मदर्स डेची सुरुवात?

आईचा सन्मान देणाऱ्या मदर्स डेची सुरुवात अमेरिकेत झाली. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस यांनी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आईचे अथक परिश्रम, तिचे बलिदान आणि समाजसेवेतील तिची भूमिका यांमुळे तिला खूप प्रेरणा मिळाली. तिचे आईवर खूप प्रेम होते. तिच्या आईचे निधन झाले तेव्हा आईबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली गेली. मग हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली.

Story img Loader