Viral wedding card: सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधी वधू-वरांचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या कृतीही व्हायरल होऊ लागतात. नुकतीच लग्नाची पत्रिका व्हायरल झाली. व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्याच्या आत लिहिलेली गोष्ट.आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की नक्की त्यात असं काय असेल? लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. यात लग्नपत्रिकाही अपवाद नाही. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडली आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत बऱ्याच लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. आतासुद्धा अशाच एका कार्डनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लग्नपत्रिकेच्या शेवटी एक सूचना देण्यात आली आहे.एका लग्नपत्रिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येकजण लग्न करतो, परंतु प्रत्येकाचे लग्न प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. केवळ अशाच लोकांची लग्नं चर्चेत येतात, जे एकतर श्रीमंत किंवा सेलिब्रिटी आहेत. अशातच, लोक त्यांचे लग्न प्रसिद्ध करण्यासाठी काहीही करू लागले आहेत. काही लोक लग्नात पैसे खर्च करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात, तर काहींना खास ठिकाणी लग्न करून जगाच्या नजरेत यायचे असते. तसे, आजकाल चर्चेत येण्याचा आणखी एक मार्ग खूप प्रचलित आहे आणि तो म्हणजे लग्नपत्रिका. लोक त्यांच्या लग्नाची पत्रिका अनोख्या पद्धतीने छापत आहेत. आजकाल अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जी पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

या पत्रिकेत निमंत्रितांना म्हटलं आहे की, लग्नात जेवण करून जा, मात्र, एकदाच जेवा कारण ताटाची किंमत दोन हजार रुपये आहे. याशिवाय अनेक गोष्टी या लग्नपत्रिकेत गमतीशीर पद्धतीनं लिहिल्या आहेत. पुढे लिहलंय की, “शर्माजींची मुलगी ही अभ्यासात हुशार आहे. तर गोपाळजींचा मुलगा बीटेक झाला असून तो दुकान सांभाळतो. गेल्या वर्षी दुबे जी जिथे निवृत्त झाले त्याच ठिकाणी हा लग्न सोहळा पार पडणार आहे, असे निमंत्रण पत्रिकेत मजेशीर भाषेत लिहिण्यात आले आहे. तर पुढे लग्न पार पडलं असून यानंतर आत्या आणि मामा यांच्या वादाचा देखील समारंभ असणार आहे. लग्नाचा हँगओव्हर अजून संपलेला नाही. रिसेप्शनचं नाटक बघायला नक्की या जे सायंकाळी सात वाजता सुरू होईल. या साठी आम्ही रात्री ८.३० वाजेपर्यंत कार्यालयात येऊ.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पोपटाची हुशारी पाहिली का? मालकिणीला सर्दी झाल्यानंतर लावतोय लाडीगोडी; अ‍ॅक्टींग पाहून पोट धरुन हसाल

एवढंच नाहीतर रिसेप्शनमध्ये येण्यासाठी काही अटीसुद्धा लग्न पत्रिकेत छापण्यात आल्या आहेत. लग्नात येतांना तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा, एवढा महागडा लग्न मंडप हा त्यांच्या खेळण्याचे मैदान नाही. लग्नात आल्यावर मामांजींना नक्की भेटा, नाही तर त्यांना राग येईल. लग्नात फक्त एकदाच जेवा करण प्रति प्लेट दर हा दोन हजार आहे. ही लग्नपत्रिका पाहून नेटकरी म्हणतात “एकदम परफेक्ट मी पण अशीच पत्रिका छापणार माझ्या लग्नात”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharma ji ki ladki gopal ji ka ladkas funny wedding card viral unique wedding card marriage card viral on social media srk