सोशल मीडियात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ तर असे असतात की, विश्वास बसत नाही. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात सगळं काही शक्य आहे असंच म्हणावं लागलं. आता ब्रिटनच्या एका कंपनीनं बनवलेलं टीशर्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे टीशर्ट पाहिल्यावर तुमच्या डोळ्यासमोर चिलखत येईल. टीशर्ट घातल्यानंतर कोणी तुमचा केसही वाकडा करू शकणार नाही. तुम्हाला बातमी वाचताना कदाचित पटणार नाही. मात्र व्हिडिओ पाहिल्यांनतर तुम्हालाही त्यावर विश्वास ठेवावा लागेल. शहरातील निर्मनुष्य भागात गुन्हेगार चाकुच्या धाकावर अनेकदा लुटमारीच्या घटना करतात. मात्र या टीशर्टमुळे ही भीती संपुष्टात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीशर्ट पहिल्यांदा पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी तयार केलं जात होतं. मात्र आता हे टीशर्ट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. टी-शर्ट घालून लोक स्वतःचे संरक्षण करू शकतील, असा कंपनीचा दावा आहे. हा टी-शर्ट ब्रिटीश कंपनी PPSS ग्रुपने बनवला आहे. टी-शर्ट विशेष फायबरपासून बनविला आहे. हा व्हिडिओ Fossbytes नावाच्या फेसबुक पेजने शेअर केला आहे. चाकूने अनेक वेळा वार करूनही अंगावर एक ओरखडाही दिसत नाही. लोकांनी टी-शर्टच्या खास वैशिष्ट्याबाबत कंपनीचे कौतुक केले. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

कार्बन फायबरपासून बनवलेल्या या आर्मर टी-शर्टच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, हाफ स्लीव्ह व्ही-नेक टी-शर्टची किंमत सुमारे १६ हजार रुपये आणि फुल स्लीव्ह टी-शर्टची किंमत सुमारे १९ हजार रुपये आहे.