काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन निशाणा साधाला आहे. थरूर यांनी सन २०१७ पासून २०१९-२० च्या आर्थिक वर्षांमधील जीडीपी म्हणजेच राष्ट्रीय सखल उत्पन्नामधील घट होणाऱ्या आलेखाची (ग्राफची) तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीशी केली आहे. थरुर यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदींचे पाच फोटो आपल्या ट्विटमध्ये वापरले आहेत. या पाचही फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीची लांबी वेगवेगळी असल्याचे दिसत आहे. याच मोदींच्या वाढलेल्या दाढीची तुलना एका आलेखाच्या मदतीने भारताच्या घसरत जाणाऱ्या जीडीपीशी करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> “फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून राज्यपालांना फोन करून विचारतात…,” कुणाल कामराचं खोचक ट्विट
सन २०१७-१८ च्या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी ८.१ असल्याचे या ग्राफमध्ये दिसत आहे. तर हाच जीडीपी २०१९-२० च्या आर्थिक वर्षामध्ये ४.५ टक्क्यांपर्यंत गडगडल्याचं दाखवण्यात आलं आहे. “ग्राफिक अलेस्ट्रेशन म्हणजे काय याचं हे उत्तम उदाहरण आहे,” अशा कॅप्शनसहीत थरूर यांनी हा फोटो शेअर केला आहे.
This is what is meant by a “graphic illustration”! pic.twitter.com/QYyA2lN2W0
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 2, 2021
“मी या App विरोधात कायदेशीर कारवाई करणार”; शशी थरूर संतापलेhttps://t.co/kRc3o2SngK
जाणून घ्या अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे सांगत थरुर यांनी नक्की काय म्हटलं आहे.#ShashiTharoor #MobileApp #App #Mobile #Congress— LoksattaLive (@LoksattaLive) March 23, 2021
२०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये १.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील दोन तिमाहीमध्ये सतत घसरण झाल्यानंतर पहिल्यांदाच जीडीपीमध्ये सकारात्मक आहे. करोनासंदर्भातील निर्बंध वर्षाच्या शेवटी आणि सुरुवातील शिथिल करण्यात आल्याने लोकांनी अधिक प्मराणात पैसे खर्च करण्यास सुरुवात केल्याने जीडीपीमध्ये सकारात्मक वाढ दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने याचा जीडीपीला फटका बसण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.