आज होळी प्रत्येकव्यक्ती आपल्या शेजाऱ्यांसोबत होळीचा आनंद घेतो. त्यानंतर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या मित्र-परिवाराला शुभेच्छा देतात. त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण शशी थरुर यांनी या शुभेच्छा एक हटके अंदाजात दिल्या आहेत.
शशी थरुर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काही हिंदू होळी खेळत असताना दिसत आहेत. यावेळी एका मुस्लीमावर चुकून होळीचा रंग उडतो आणि तो कटाक्ष नजरेने सगळ्यांना पाहत असतो. यावेळी तिथे असलेले काही लोक घाबरतात पण, एक व्यक्ती माफी मागत त्याच्या हातात असलेला रंग हा त्या मुस्लीम व्यक्तीला लावतो आणि होळीच्या शुभेच्छा देतो. हे पाहता मुस्लीम व्यक्तीही त्या माणसाला होळीचा रंग लावते. या व्हिडीओत शेवटी आपला झेंडा हा भगवा आणि हिरव्या रंगा शिवाय अपूर्ण आहे आणि आपला देशही. त्यामुळे द्वेष करू नका. होळीच्या शुभेच्छा , असे कॅप्शन दिसते. हा व्हिडीओ शेअर करत शशी थरूर म्हणाले, “एक अप्रतिम व्हिडीओ, सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा!”
आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video
शशी थरूर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांची स्तुती केली आहे. दरम्यान, यावेळी सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या प्रकारे होळीच्य शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी त्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत, तर काहींनी फोटो. या सगळ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर त्यांचा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मुलीसोबतचा फोटो शेअर करत सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.