अनेकदा प्रवास हा कंटाळवाणाच असतो, पण नेहमीच्या कंटाळवाण्या प्रवासापेक्षा स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या लेखिकेला मात्र सगळ्यात भन्नाट अनुभव आला. कॅरोन ग्रिइव्ह नावाची लेखिका ग्लासग्लोवरून ग्रीसमधल्या क्रीट बेटावर जायला निघाली, पण जेव्हा ती विमानात चढली तेव्हा तिला धक्काच बसला कारण विमानात ती सोडून एकही प्रवासी नव्हता. विमान पूर्ण रिकामचं होतं. आता विमानात आपण एकटेच आहोत म्हटल्यावर विमान कंपनी कदाचित उड्डाण रद्द करेल अशी भीती कॅरोनला होती, पण ती ज्या ‘जेट२’ विमानानं प्रवास करत होती त्यांनी तिला अगदी ‘व्हिव्हिआयपी’ सेवा पुरवली.

Viral Video : दिलखेचक अदा आणि दमदार नृत्याने दोघींनी केलं नेटकऱ्यांना घायाळ

विमान प्रवास सुरू व्हायच्या आधी प्रत्येक प्रवाशांना आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं याबद्दल सूचना देण्यात येतात कॅरोन एकटीच होती तरीदेखील तिला या सूचना देण्यात आल्या. विमानातल्या एअर होस्टेसनं कॅरोनची पूरेपूर काळजी घेतली, त्यामुळे अगदी राणीसारखा अनुभव कॅरोनच्या वाट्याला आला. कॅरोन एकटीच असल्यानं विमानाच्या पायलटपासून ते एअरहोस्टेसपर्यंत सगळ्यांना तिचं नाव माहिती झालं. ती विमानात चढल्यावर प्रत्येकानं तिच्या जवळ जाऊन तिचं स्वागत केलं.

व्हिव्हिआयपी सेवेनं पूर्णपणे भारावून गेलेल्या कॅरोननं रिकाम्या विमानातला आपला सेल्फी ट्विटवर शेअर करत या विमानसेवेचं भरभरून कौतुक केलं.

Story img Loader